google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात कोरोना रुग्णांचा रुग्णांचा आकडा वाढला : मंगळवारी 33 रुग्ण पॉझिटिव्ह

Breaking News

सांगोल्यात कोरोना रुग्णांचा रुग्णांचा आकडा वाढला : मंगळवारी 33 रुग्ण पॉझिटिव्ह

 सांगोल्यात कोरोना रुग्णांचा रुग्णांचा आकडा वाढला : मंगळवारी 33 रुग्ण पॉझिटिव्ह 


सांगोला शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसोंदिवस वाढला आहे .तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे . दि.६ रोजी सांगोला शहरात ८ तर ग्रामीण भागामध्ये पाचेगाव बु -५ , बलवडी- ३ , घेरडी , नाझरा , ह . दहिवडी , सोनंद व वाढेगाव प्रत्येकी -२ , कमलापूर , जवळा , मेडशिंगी , डोंगरगाव , मांजरी , आलेगाव , खवासपूर गावात प्रत्येकी १ असे एकूण ३३ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे . कोरोनाचे पुन्हा एकदा तालुक्यावर संकट आले आहे . तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या तालुक्यात एकुण २५४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत . यापैकी काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही कमलापुर कोविड सेंटरमध्ये दाखल झाले आहेत . या सर्व रुग्णांवर शासनाकडून उपचार केले जात आहेत . सांगोला तालुक्यात कोरोना लस उपलब्ध झाली असली तरी रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे . यामुळे प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढतआहे . तालुक्यात मास्क , सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यानंतरही रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कोरोना चे संकट पुन्हा गडद होत चालले आहे. लसीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू असून ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments