google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तुम्हाला शेती असेल तर असा काढा शेतकरी दाखला व त्याचा असा घ्या फायदा !

Breaking News

तुम्हाला शेती असेल तर असा काढा शेतकरी दाखला व त्याचा असा घ्या फायदा !

 तुम्हाला शेती असेल तर असा काढा शेतकरी दाखला व त्याचा असा घ्या फायदा !


 शासकीय सोई सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच काही स्कीम घेण्यासाठी तुमच्या कडे जद शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे दाखला असेल तर त्याचा फायदाच होतो. याकरिता हा शेतकरी दाखला कुठे उपयोगी पडतो व तो कुठल्या ठीकाणी मिळतो ते पहा सध्या कृषीच्या प्रवेशासाठी देखील हा दाखला लागतो.प्रवेश घेताना हा दाखला सादर केला तर तुम्हाला याचा फायदा चांगला होतो.जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल तर तुम्हाला शेतकरी प्रमाण पत्र सादर करावे लागते.शेतकरी प्रमाणपत्र हे 2ठिकाणी उपलब्ध होते तहसीलदार कार्यालयात जे सेतू केंद्र आहे तिथे ते उपलब्ध होऊ शकते,किंवा महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार ह्या पोर्टल वर देखील उपलब्ध होऊ शकते.आपले सरकार ह्या पोर्टलच्या वेबसाईट ला भेट देऊन तुम्ही हे प्रमाणपत्र काढू शकता.खालील कागदपत्र हे प्रमाणपत्र काढताना अवश्यक आहेत. पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड रोजगार हामी योजना ओळखपत्र ड्राइविंग लाईन्सन्स फोटो या पैकी एक ओळख पत्र अवश्य लागत.कुठलेही ओळख पत्र जे तुमचा पता दर्शवतील असे असावे.पता दर्शवणारे ओळख पत्र नेहमी पासपोर्ट,आधारकार्ड,वीजबिल किंवा तुमचा सातबारा असावा.ओळखपत्राऐवजी सातबारा उतारा ,८अ उतारा असणे आवश्यक आहे.हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषण पत्र भरून देने खूप गरजेचे असते.हे अर्जासोबत भरून देने खूप अनिवार्य असते. अर्ज व स्वयंघोषण पत्र भरून दिल्यानन्तर 15 दिवसांमध्ये हा अर्ज तुमचा मंजूर होऊन जातो. अशाप्रकारे शेतकरी दाखला काढा व त्याचा उपयोग करा. शेतकऱ्यांसाठी माहितीस्तव....

Post a Comment

0 Comments