सांगोला तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर ; आज आढळले १६ पॉझिटिव्ह रुग्ण ; तालुक्यात २२६ ॲक्टिव रूग्ण ! सांगोला शहर आणि तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढला आहे . रुग्णांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे .
सोमवारी सांगोला शहरात ५ तर ग्रामीण भागामध्ये मेथवडे -३ , महुद -२ , देवकतेवाडी , चिणके , नाझरा , कमलापूर , इटकी , महिम गावात प्रत्येकी १ असे एकूण १६ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे . कोरोनाचे पुन्हा एकदा तालुक्यावर संकट आले आहे . तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या एकुण २२६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत . यापैकी काही खाजगी रुग्णालयात उपचारघेत आहेत तर काही कमलापुर कोविड सेंटरमध्ये दाखल झाले आहेत . या रुग्णांवर शासनाकडून उपचार केले जात आहेत . यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाला आहे . सांगोला तालुक्यात कोरोना लस उपलब्ध झाली असले तरी रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे . यामुळे प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढतआहे . तालुक्यात मास्क , सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्यानंतरही रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कोरोना चे संकट पुन्हा गडद होत आहे . कोरोना लसीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू असून आज आखेर सांगोला तालुक्यात ८ हजार २ ९ २ नागरिकांना लस टोचणी करण्यात आली आहे . ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे .
0 Comments