google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 BreakingNews सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवे आदेश;

Breaking News

BreakingNews सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवे आदेश;

 BreakingNews सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवे आदेश; सोलापूर जिल्ह्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. सुधारित आदेशानुसार सोलापूर शहर हद्द वगळून ३० एप्रिलपर्यंत आदेश काढले आहेत.


सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून ) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील कोव्हीड -१९ चे मोठया प्रमाणात वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक सूचना / आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

१ ) फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे : a ) संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ( पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद्द वगळून ) फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत आहे . b ) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० वा . पर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही किंवा एकत्र फिरता येणार नाही . c ) उर्वरीत कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० वा . पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ०८.०० ते सोमवारी सकाळी ०७.०० वा . पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय खालील दिलेल्या कारणाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. d ) वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात येत असून त्या नियमित कार्यरत राहतील. e ) अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील. :

a ) हॉस्पीटल, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. 

b ) किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्य पदार्थांची दुकाने. 

c ) सार्वजनिक वाहतूक : – रेल्वे , टॅक्सी , ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस.

 d ) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा. 

c ) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे, ) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. g ) मालवाहतूक h ) कृषी निगडीत सेवा i ) ई – कॉमर्स. j ) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी, k ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा.२ ) घराबाहेरील उपक्रम : a ) सर्व बागा / सार्वजनिक मैदाने / बीच रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० वा . पर्यंत सोमवार ते शुक्रवार या आठवड्याच्या दिवशी बंद राहतील आणि शुक्रवारी रात्री ०८.०० पासून सोमवारी सकाळी ०७.०० वा. पर्यंत बंद राहतील. b ) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० या वेळेत उपरोक्त ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्तींनी कोव्हीड -१९ बाबत योग्य वर्तन करुन सक्त काळजी घ्यावी.c. विद्युत पुरवठयाशी संबंधीत कंपन्या . d . टेलिफोन सेवा देणान्या आस्थापना . e. इन्श्युरन्स / मेडिक्लेम कंपन्या. f. औषधांचे उत्पादनाचे व्यवस्थापन / वितरण करणाऱ्या फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये, b ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यामध्ये आवश्यकता अपवाद असल्यास अधिकचे निर्देश देऊ शकेल. b ) सरकारी कार्यालये त्यांच्या क्षमतेच्या ५० % इतक्या उपस्थितीत चालू राहतील. तथापि कोव्हीड -१९ संदर्भात आवश्यक असलेले मनुष्यबळ १०० % इतक्या क्षमतेने संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुखाच्या निर्णयावर चालू ठेवण्यात यावे c) विद्युत, पाणी पुरवठा आणि बँकींग, फायनान्स सहीसेस संदर्भातील सर्व सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. d ) सरकारी कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांच्या बाबतीतील सर्व बैठका त्या कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्या व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील. e ) सरकारी कार्यालयामध्ये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये अभ्यागतांना येण्यास परवानगी नसेल. तसेच सर्व कार्यालयांनी लवकरात लवकर ई – व्हिजीटर सिस्टीम लवकरात लवकर चालू करावी.सरकारी कार्यालयामध्ये येण्याची अत्यावश्यकता भासल्यास कार्यालय प्रमुखांनी अभ्यागतांसाठी मागील ४८ तासांचा Negative RTPCR अहवाल असल्यास पास देण्याची व्यवस्था करावी . g ) सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी भारत सरकारच्या निकषानुसार लवकरात लवकर कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे . जेणे करुन कोव्हीड -१९ चा प्रसाराची भिती संपून तातडीने कार्यालये शासनास पुन्हा उघडता येतील.

Post a Comment

0 Comments