google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा करण्यात

Breaking News

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा करण्यात

 विज्ञान महाविद्यालय येथे जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साहेबराव जुंदळे म्हणाले की आज समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे अपंगत्व हे व्यक्तीला प्राप्त होत आहे


परंतु ह्या अपंगत्वावर ते मात करून जीवन जगता आले पाहिजे आपल्या ठिकाणी अपंगत्व याची जाणीव होऊ न देता आपल्या कला-गुणांना कौशल्यांना व्यक्त करून राष्ट्रउभारणीसाठी हातभार लावला पाहिजे समाजाने त्यांना प्रोत्साहन प्रेरणा देऊन नव्याने उभारी दिली पाहिजे त्यांच्या जिद्दीला संधी प्राप्त करून दिली पाहिजे शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या कला गुणांना कौशल्यांना व्यक्त केले पाहिजे याच भूमिकेतून आपण जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा करत आहोत   नियोजित समितीचे चेअरमन प्रा दीपक रिटे यांनी जागतिक अपंग साह्यता दिन साजरा करण्याच्या पाठीमागचे भूमिका स्पष्ट केल महाविद्यालयातील कर्मचारी बाबासाहेब गावडे खुळे विलास प्रा सगरे कैलास इत्यादी सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिपक शेटे यांनी केले तर आभार प्रा डॉ ठोंबरे सर यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित उपप्राचार्य संभाजीराव शिंदे प्रा हाके एम ए इंगवले आर ठोंबरे शामराव स्वप्नील शिंदे गाडे सर फुले गोळी सर पांडे सर घोसाळे वसंत प्रकाश जांगडे भगवान पवार विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टन शन ठेवून पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments