google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या विनयभंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव यांना झालेली ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा अपिलात कायम .

Breaking News

पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या विनयभंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव यांना झालेली ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा अपिलात कायम .

 पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या विनयभंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव यांना झालेली ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा अपिलात कायम .


मंगळवेढा येथे सन २००८ मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास हरिबा यादव यांनी पोलीस स्टेशनमध्ये पिडीत मुलीच्या केलेल्या विनयभंग प्रकरणी मंगळवेढा येथील ज्यु.म. वर्ग १ यांनी नियमित फौजदारी खटला क . ४/२०१२ मध्ये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी व रूपये १० हजार दंड अशी शिक्षेवर पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेले क्रिमीनल अपील क . ३१/२०१५ पंढरपूर येथील अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी नामंजुर करून खालील शिक्षा कायम केलेली आहे .यात हकीकत अशी आहे की , यातील पिडीत मुलीस तिचे शेजारी राहणा – या आरोपी याने पळवून नेलेले होते . त्याबाबतची फिर्याद पिडीत मुलीचे आईने दिलेली होती . सदर पिडीत मुलगी अकलुज एसटी स्टॅडवर पोलीसांना मिळून आली व तिला मंगळवेढा पोलीस स्टेशनला आणलेले होते . मंगळवेढा पोलीस ठाणेत दि . १७/०३/२००८ रोजी घडला असून पिडीत मुलगी ही मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये असताना पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव व एक महिला पोलीस तिला एका खोलीत घेवून गेले व त्याप्रमाणे तपासकामी तिचे अंगावर असलेले कपडे जप्त करून तिला दुसरे कपडे अंगावर घालण्यासाठी दिले होते थोडया वेळाने महिला पोलीस तेथून निघून गेल्यानंतर १८:०० ते १८:३० वाचे सुमारास पिडीत मुलगी : खुर्चीवर बसलेली असताना व महिला पोलीस सोबत नसताना आरोपी अंबादास यादव तिचेजवळ आले व तिचे पाठीवर पाहिले व पिडीत मुलीस पॅन्ट काढण्यास सांगितली त्यावेळी पिडीत मुलगी बाथरूमला जायचे आहे असा बहाणा करून तेथून बाहेर पळून आली .त्यानंतर पिडीत मुलीला आई वडिल भेटण्यास आल्यानंतर तिने घडल्या प्रकाराबददल आईला सांगितले व त्याप्रमाणे तिचे आईने याबाबत फिर्याद देण्यास गेली असता तिची फिर्याद घेतली गेली नाही . त्याप्रमाणे तिने मंगळवेढा येथील ज्यु.म. वर्ग १ कोर्टात दाखल केलेल्या फिर्यादीवरून त्यामध्ये सीआरपीसी १५६ ( ३ ) प्रमाणे झालेल्या आदेशाप्रमाणे आरोपीविरूध्द मंगळवेढा पोलीस स्टेशनला गुरनं . २०/२००८ दाखल करण्यात आलेला होता व त्याप्रमाणे नियमित फौजदारी खटला = क . ४/२०१२ नुसार कामकाज चालले . यामध्ये पिडीत मुलीचे आई वडिल व पिडीत मुलगी यांची साक्ष नोंदविण्यात आली होती .खालील न्यायालयाने पिडीत मुलीची साक्ष व तिच्या आई वडिलांना तिच्या साक्षीबाबत पुरक अशी साक्ष दिली आणि आरोपी हा त्या खोलीतुन महिला पोलीस बाहेर गेल्यानंतर तिच्या खोलीत प्रवेश करून तिचेबाबत सदरचे कृत्य केले व आरोपीस अशा खोटया केसमध्ये गुंतविण्याचे कारण नाही व जरी फिर्याद देण्यास विलंब झाला असला तरी झालेला एकंदर प्रकार व फिर्याद दाखल करणेबाबत पिडीत मुलीचे आईने केलेले सर्व प्रयत्न पाहता तिने फिर्याद दाखल करण्यास मुददाम विलंब केला नाही व आरोपीने केलेला गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस भादवि ३५४ करीता ६ महिने सक्तमजुरी व रूपये १० हजार दंड व पिडीत मुलीस सीआरपीसी ३५७ ( ३ ) नुसार रूपये ५ हजार नुकसानभरपाई देण्याचा आदेश केलेला होता .सदर निकालावर आरोपीने पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात किमीनल अपील क . ३१ / २०१५ दाखल केलेले होते व यामध्ये आरोपीस खोटया गुन्हयात गुंतविलेले आहे व याकामी तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविली गेलेली नाही व इतर हजर असलेले पोलीस अधिकारी यांच्या साक्षी तपासल्या नाहीत तसेच पिडीत मुलीस पळवून नेणारा आरोपी अटक न झाल्यामुळे चिडून फिर्याद दाखल केलेली आहे व शिक्षा देण्याइतपत सबळ पुरावा रेकॉर्डवर नाही त्यामुळे आरोपीस निर्दोष मुक्त करण्याबाबतचा युक्तिवाद करण्यात आला . त्याप्रमाणे सरकारपक्षातर्फे पिडीत मुलगी व तिचे आई वडिल यांच्या साक्षी एकमेकास पुरक असून पिडीत मुलीची साक्ष अत्यंत विश्वासार्ह आहे .सदर केसमध्ये साक्षीदारांच्या साक्षीत कोणतेही विसंगती नसल्याने तपासी अधिकारी यांची साक्ष ही तांत्रिक स्वरूपाची असल्याने सदर साक्ष न घेतल्याने त्याचा कोणताही परिणाम या केसवर होत नाही व कोणतीही महिला पोलीस सोबत नसताना आरोपीने महिला पोलीस बाहेर गेल्यानंतर सदरचे कृत्य केलेले आहे . खालील न्यायालयाने या सर्व बाबी तपासून सदरची शिक्षा सुनावलेली आहे ती कायम करण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आला . त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचा युक्तिवाद व खालील न्यायालयातील झालेले जाबजबाब व इतर कागदपत्रे यांचे अवलोकन करून पंढरपूर येथील अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के मोरे यांनी आरोपीचे अपील नामंजुर करून खालील शिक्षा कायम केली . यात सरकारपक्षातर्फे अँड . सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले .

Post a Comment

0 Comments