शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे . दि . १ एप्रिल २०१६ नंतर मुलीचा जन्म झाला असेल , आणि ती मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यावर एक लाख रुपये शासन जमा करणार आहे
. सुरुवातीच्या काळात या योजनेचा लाभ फक्त दारिद्रयरेषेखालील कुटुंबीयांनाच घेता येत होता . आता सुधारित आदेशानुसार याचा लाभ कोणत्याही कुटुंबातील मुलींना घेता येणार आहे . या योजनेंतर्गत एखाद्या कुटुंबात १ एप्रिल २०१६ नंतर एका मुलीचा जन्म झाला असेल तर ती मुलगी १८ वर्षांची झाल्यास तिच्या खात्यावर एक लाख रुपये शासन जमाकरणार आहे . या व्यतिरिक्त तिला वयाची १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत विविध टप्प्यांवर विविध योजनांचाही लाभ शासनाकडून मिळणार आहे . मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपये मिळणार आहेत . तसेच तिच्या आजी आजोबांना पाच हजार रुपयांच्याकिमतीचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे ; तसेच ती मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपये मिळणार आहेत . पाच वर्षांची मिळून ती रकम दहा हजार रुपये इतकी आहे . त्यानंतर ती मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार रुपये | येणार आहेत.ही रक्कम एकूण साडेबारा | हजार रुपये इतकी होणार आहे . त्यानंतर | सहावी ते बारावीच्या शिक्षणासाठी | प्रत्येक वर्षी तीन हजार रुपयांप्रमाणे | पैसे देण्यात येणार आहेत . ही रक्कमही | तब्बल २१ हजार रुपये इतकी होत आहे आणि मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर | | तिला एकरकमी एक लाख रुपये | मिळणार आहेत . या योजनेचा लाभ | घेण्यासाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाकरण्याची अट आहे . याबाबतची अधिक माहिती | प्रत्येक तालुक्यातील व शहरातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे . मात्र , ही योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे.संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेतील निम्म्या रकमेचा लाभ मिळणार आहे
0 Comments