google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या..,सोलापुर शहरातील घटना

Breaking News

महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या..,सोलापुर शहरातील घटना

 महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या..,सोलापुर शहरातील घटना सोलापूर शहर आयुक्तालय अंतर्गत जोडभावी पेठ पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचा-याने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे


. याच पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेल्या एका अधिका-याने सदर महिला कर्मचा-यास व्हाटस अॅपच्या माध्यमातून संदेश पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या पतीकडून करण्यात आला आहे सदर महिला कर्मचा-यास बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापुर्वीच तिचे निधन झाले. मृत महिला कर्मचा-याचे नातेवाईक शोकसागरात असल्यामुळे याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेत जो कुणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध रितसर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments