google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात तब्बल १३४ वर्षानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाला मिळणार नवी इमारत

Breaking News

सांगोल्यात तब्बल १३४ वर्षानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाला मिळणार नवी इमारत

 सांगोल्यात तब्बल १३४ वर्षानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाला मिळणार नवी इमारत !  सांगोला येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तब्बल १३४ वर्षापासून अडगळीत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा अखेर लवकरच वनवास संपणार आहे . नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र यांचेमार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व सोयी सुविधा असलेली दुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधून तयार झाल्याने जुन्या कार्यालयाचे नवीन जागेत लवकरच स्थलांतर होणार आहे .


तर नवीन इमारतीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांसह पक्षकारांची होणारी गैरसोय कायमस्वरूपी मिटणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे . सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात तब्बल १३४ वर्षापासून अभिलेख कक्ष व नोंदणी कक्ष असे दुय्यम निबंधक कार्यालयाचे एका खोलीत कामकाज सुरू आहे . या ठिकाणी १ दुय्यम निबंधक , २ लिपिक , संगणक ऑपरेटरसह कर्मचारी एकत्र बसून दैनंदिन कार्यालयीन कामकाज पाहतात . तालुक्यातून मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी आलेल्या पक्षकारांना या कार्यालयात धड नीट उभेही राहता येत नव्हते . अक्षरशः अधिकारी कर्मचाऱ्यांसह पक्षकारांची दस्त नोंदणी करताना दमछाक होत होती . कार्यालयाची ही अवस्था पाहून तात्कालीन सोलापूर जिल्हा मुद्रांक अधिकारी दुतोंडे यांनी सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयास स्वतंत्र इमारत असावी म्हणून नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र यांच्याकडे सतत पाठपुरावा करून कार्यालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत मंजूर करून घेतली . सांगोला तहसील कार्यालयाच्या दक्षिणेकडील जागेत अर्थसंकल्पीय ४० / ५ ९ या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे १ कोटी ३० लाख रुपये मंजूरी मिळाली होती . या निधीतून ठेकेदाराकडून २८ मे २०१८ रोजी प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली होती प्रत्यक्षात २७ मे २०२० पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते . मात्र कोरोनाच्या काळात बांधकामाचे काम रखडल्याने नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही . या इमारतीत अभिलेख कक्ष , नोंदणी कक्ष , रेकॉर्ड रूम पक्षकारांना थांबण्यासाठी हॉल , प्रसाधन गृह अशी सर्व सोयी सुविधा असलेली दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत बांधून तयार झाल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे . सध्या या कार्यालयातील अंतर्गत विजेची , फर्निचर व संरक्षक भिंतीच्या जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामे युद्धपातळीवर सुरू असून मार्च अखेर पूर्ण होतील असे शाखा अभियंता के.यु.गिरी यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments