google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वनविभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर घेरडी - आगलावेवाडी वनपरिक्षेत्रात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कामाचा सपाटा !

Breaking News

वनविभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर घेरडी - आगलावेवाडी वनपरिक्षेत्रात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कामाचा सपाटा !

 वनविभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर घेरडी - आगलावेवाडी वनपरिक्षेत्रात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कामाचा सपाटा ! सांगोला / नाना हालंगडे सांगोला तालुक्यात वनपरिक्षेत्रात सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे.पण वनपरिक्षेत्राचा विजय मात्र धुमधडाक्यात सुरू आहे . घेरडी बिट अंतर्गत असलेल्या घेरडी व आगलावेवाडी मध्ये नवीन लागवडीसाठी पीसीएमची कामे मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्रणाव्दारे सुरू असल्यामुळे , गावातील स्थानिक लोकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.


वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी येत असून अधिका-यापासून ते कर्मचा-या पर्यंत सगळीच मंडळी जुनीच कामे नव्याने केल्याचे दाखवून बिले काढत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत . सध्या घेरडी वनपरिक्षेत्रात वनपालाच्या कृपाआर्शिवादाने असे हे गैरप्रकार काही मोजक्या वनमजुरांना हाताशी धरून हे प्रकार होत असल्याचे कंत्राटी वनमजुराने सांगितले . सध्या घेरडी गावासाठी असलेला वनमजुर कंत्राटी वनमजुरांना त्रासदायक ठरीत असून वरीष्ठांकडे लावालाव्या करून त्यांना घरचा रस्ता दाखवत आहे.हा वनमजुर म्हणजे तालुकचा वनपरिक्षेत्र अधिकारीच झालेला आहे . याबाबत काल वनपरिक्षेत्र अधिका-याखडे संपर्क केला असता त्यांनीही कानावर हात ठेवले . येथे वनरक्षक आठवड्यातून एकदा हजेरी लावतात . सध्या घेरडी गावांतर्गत चार जेसीबी यंत्राव्दारे पीसीएमची कामे सुरू आहेत . तर आगलावेवाडीमध्ये दोन जेसीबी यंत्राव्दारे ही कामे सुरू आहेत . मध्यंतरी काही दिवसांपूर्वी घेरडी व हंगिरगे येथील वनपरिक्षेत्राला आग लागली . यामध्ये लाखों रूपयांचे नुकसान झाले पण वनविभागाने याची काही दखल घेतली नाही . घेरडी बीटअंतर्गत घेरडी , वाणीचिंचाळे , हंगिरगे , गावडेवाडी , डिकसळ , हबिसेवाडी , नराळे , आगलावेवाडी , व अन्य गावांचा समावेश आहे . प्रत्येक ठिकाणी वनमजुरांच्या नेमणुका आहेत . पण हे वनमजुर कामावरच हजर राहत नाहीत . वनपाल व वनरक्षकाचा यांच्या डोक्यावरती हात असल्यामुळे हे ही निगरगट्ट झालेले आहेत . दहा - दहा वर्षापासून हे वनमजुर त्या त्या गावाला चिकटून आहेत . वनरक्षकच दुर्लक्षित करीत असल्यामुळे आओ जावो वन तुम्हारा अशी अवस्था या वनपरिक्षेत्राची झालेली आहे . आज मोठ्या प्रमाणात त्या वनपरिक्षेत्रामध्ये झाडांची कत्तल झालेली पहावयास मिळत आहे . कडक उन्हाळा असूनही या वनपरिक्षेत्रातील पानवटे भरली जात नाहीत . त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर मानव वस्तीमध्ये वाढलेला आहे . आज मार्च एन्डच्या लगबगीने मजुरांची कामे यंत्राव्दारे करून वनविभाग लाखो रूपयांचा मलिदा गोळा करीत आहे . याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्यांसह उपवनसंरक्षक सोलापूर व पुणे वनभवन येथे तक्रार केलेली आहे . याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे

Post a Comment

0 Comments