google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोनाचे खोटे अहवाल टेक्निशियन गजाआड !

Breaking News

कोरोनाचे खोटे अहवाल टेक्निशियन गजाआड !

 कोरोनाचे खोटे अहवाल देणारा टेक्निशियनला बेड्या !कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालाही दिले जातात निगेटीव्ह असल्याचे अहवाल आणि केला जातोय लोकांच्या जीवाशी खेळ !कोरोनाचे खोटे अहवाल टेक्निशियन गजाआड ! 


मुंबई : कोरोनाचे खोटे अहवाल तयार करणाऱ्या टेक्निशियन अब्दुल खान हा अखेर गजाआड गेला असून त्याची ही कृती नागरिकांच्या जीवाशी खेळणारी असल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे अहवाल अलीकडे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. काही नागरिक आधीपासूनच कोरोनाच्या अहवालाबाबत शंका व्यक्त करीत होते पण आता हळूहळू याला दुजोरा मिळत चालला आहे. अमरावती येथील प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर आणखी काही ठिकाणी तक्रारी आल्या. काल विधानसभेतही याबाबत चर्चा झाली. काही आमदारांचे कोरोना अहवाल आधी पॉझिटिव्ह आणि एक अथवा दोन दिवसात निगेटिव्ह आल्याच्या घटना घडल्या. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रकार घडू लागल्याने कोरोनाची तपासणी यंत्रणा सदोष असल्याचेही मत व्यक्त होऊ लागले. अशा शंकेच्या वातावरणात मुंबई येथील एका लॅबोरेटरीचा टेक्निशियन हा उद्योग करीत असल्याचे समोर आले. मुंबईच्या एस-एस पॅथलॉजी लॅबमध्ये टेक्निशन असलेला अब्दुल हा पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनाही कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल देत होता. थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये लीगल एक्झिक्युटिव्ह असलेल्या बिरदेव सरवदे यांच्या लक्षात हा प्रकार आला. रमेश खबरांनी नावाच्या रुग्णाला असा बनावट अहवाल देण्यात आला होता. खबरानी याच्या रक्ताचे तसेच अन्य नमुन्याची तपासणी माहिती येण्याआधीच अब्दुल साजिद खान याने अहवाल निगेटीव्ह लिहून तो रुग्णाच्या स्वाधीन केला त्यामुळे ही बाब उघडकीस आली. त्यानंतर आलेल्या खऱ्या अहवालात रमेश खबरानी हे पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. शिवाजीनगर पोलिसांनी अब्दुल खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या साखळीत आणखी कोण कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.     

Post a Comment

0 Comments