सांगोला तालुक्यातील १ लाख २२ हजार ८६९ ७/१२ उता-यापैकी १ लाख २२ हजार ३५५ गटाचे ७/१२ उतारे डिजिटल स्वाक्षरीने मिळणार ; नायब तहसीलदार किशोर बडवे यांची माहिती !जमिनीच्या संबंधित महत्त्वाचा पुरावा म्हणून समजल्या जाणाऱ्या ७/१२ उताऱ्यामध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत . आता खातेदारांना डिजिटल स्वाक्षरी ७/१२ उतारे मिळणार आहेत. ७/२२ उतारावर सही शिक्क्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे उतारे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही . तर ऑनलाइन पद्धतीने खातेदारांना स्वाक्षरी चे ७/१२ उतारा मिळणार आहेत . यामुळे खातेदारांना सहजरीत्या उतारे उपलब्ध होणार आहेत . घरबसल्या नागरिकांना ७/१२ उतारा मिळवता यावा याकरिता , सांगोला तालुक्यातील १०४ गावचे ७/१२ उतारे संगणकीकृत करण्यात आले आहेत .
तालुक्यातील १०४ महसुली गावामधील ७/१२ उता-यांची एकूण १ लाख २२ हजार ८६९ गटांची संख्या आहे .त्यापैकी १ लाख २२ हजार ३५५ गटाचे ७/१२ उतारे तयार करून नागरिकांसाठी ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत . त्यामुळे खातेदारांना सहजरित्या ७/१२ उतारे उपलब्ध होणार आहेत . उर्वरित ५१४ गट अद्याप ऑनलाईन करण्याचे काम प्रलंबित आहे . यामधील अडीअडचणी १ ते ४१ अहवाल म्हणजेच , क्षेत्राचा मेळ घेणे , सहहिस्सेदारांच्या हरकतीचे निराकरण करणे हे काम सध्या महसूल प्रशासन करीत आहे. यासाठी गुरुवार दिनांक ४ व शुक्रवार दिनांक ५ रोजी ओडिसी व डी.एस. डी अहवाल निर्गत करण्यासाठी पु . अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे कॅम्प सुरू आहे .


0 Comments