google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सरपंचानाही निधी दिला जातो....?

Breaking News

सरपंचानाही निधी दिला जातो....?

 सरपंचानाही निधी  दिला जातो....?

1) लोकप्रतिनिधीं मध्ये खासदार ,आमदार, जि प, पं  स आणि ग्रामपंचायतिचे सदस्य येतात.2)ग्रामपंचायत प्रतिनिधींना  खालील कामांचे प्रस्ताव  ग्रामविकास विभाग ,बांधकाम भवन,25 मर्झबान रोड,फोर्ट मुंबई 400001 यांचेकडे थेट सादर करावयाचे आहेत.


3) कामांचे  नाव :-1) गावांतर्गत रस्ते. 2) गटारे.3) पाऊसपाणी निचरा.4) दहन व दफन भूमीची सुधारणा करणे. 5,)  संरक्षक भिंत. 6)  ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम.7)  आठवडे बाजारासाठी सुविधा. 8)  कचरा डेपोसाठी  व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुविधा. 9) वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण. 10) समाजमंदिर /सभागृह. 11) सार्वजनिक  शौचालय. 12) रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक. 13) व्यायामशाळा  बांधकाम करणे. 14)  प्रवासी निवारा शेड.  15) वाचनालय ईमारत बांधकाम करणे 16)  नदीघाट/धोबीघाट बांधकाम करणे.17 ) बगीचे.  18) पथ दिवे बसविणे. 19) चौकाचे सुशोभीकरण .20) ,,इतर मूलभूत बाबी ....4) प्रतिनिधींनी सुचवलेली कामे निवडीचे अधिकार शासनास  आहेत . 5) प्रतिनिधींनी सुचवलेली कामे  जि प किंवा  पंचायत  समिती  किंवा ग्रामपंचायत या पैकी  कोणत्या  यंत्रणेकडून  करण्यात यावीत  हा निर्णय  शासन स्तरावर घेतला जाईल .                      6) ग्रामपंचायती  मार्फत करावयाची कामे  25 मार्च 2015  च्या शासन निर्णयातील सूचना व कार्यपद्धती नुसार करावयाची आहेत .*7)  ग्रामपंचायती  मार्फत करावयाच्या कामाचा निधी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे  वितरित करण्यात येतो माननीय सर्व सरपंच  याना विनंती , की त्यांनी गावांतर्गत सुचवावयाची मूलभूत सुविधा कामे ग्रामविकास विभागा कडे पाठवावीत त्यामुळे मजुरांना रोजगार मिळेल आणि गावाचा विकास होईल*

*मा पुरुषोत्तम घोगरे पाटील*संस्थापक राज्याध्यक्ष *भाऊसाहे कळसकर*सोशल मिडीया राज्य प्रमुख *सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य*

Post a Comment

0 Comments