धक्कादायक! मुख्यद्यापकाने केला अल्पवयीन ‘विद्यार्थिनी’वर बलात्कार; महाराष्ट्रातील घटना महाबळेश्वर | गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे घडली आहे. मुख्यद्यापकाने आपल्याच शाळेत शिकत असणाऱ्या १० वितील मुलीवर वारंवार बलात्कार केले,
महिला दिना – दिवशीच हा प्रकार उघडकीस आला, मुख्यद्यापक नराधमाला अटक करण्यात आली आहे.१५ वर्षीय मुलीवर दिलीप रामचंद्र ढेबे (वय – ५०) मु.पो – मेटगुताड, ता – महाबळेश्वर याने विद्यार्थिनीला प्रयोग शाळेच्या खोलीमध्ये घेऊन जाऊन वारंवार बलात्कार करायचा. महिला दिनादिवशी सगळीकडे उत्साह होता त्यादिवशी मुलीवर बलात्कार करत होता. एका अनोळख्या व्यक्तीने १०९८ या क्रमांकावर फोन करून सदर तक्रार दिली.त्यानंतर सदर गुन्ह्याची फाईल महाबळेश्वर पोलिसांकडे सोपवण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करताना, सदर अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतले, तिने तिच्या सोबत घडणारा सर्व प्रकार पोलिसांना सांगितलं. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यद्यापकाला अटक करण्यात आली आहे. त्यांनीही गुन्हा कबूल केला आहे.


0 Comments