google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरातील 87 दिव्यांगाना मिळणार आरोग्य विम्याचा लाभ लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती

Breaking News

शहरातील 87 दिव्यांगाना मिळणार आरोग्य विम्याचा लाभ लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती

 शहरातील 87 दिव्यांगाना मिळणार आरोग्य विम्याचा लाभ लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती 


सांगोला :शासन नियमानुसार दरवर्षी आर्थिक बजेटच्या 5 टक्के निधी हा दिव्यांगाच्या कल्याणासाठी राखीव ठेवण्याचा ठराव सांगोला नगरपरिषदेमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार सन  2017-18 मध्ये 37 दिव्यांगाना प्रत्येकी 8 हजार रूपये प्रमाणे एकूण 2 लाख 96 हजार रूपये, 2018-19 मध्ये 36 दिव्यांगाना प्रत्येकी 8 हजार प्रमाणे 2 लाख 88 हजार रूपये, 2019-2020 मध्ये 9 दिव्यांगाना प्रत्येकी 8 हजार रूपये प्रमाणे 72 हजार रूपये असे एकूण 82 दिव्यांग लाभार्थ्यांना 6 लाख 56 हजार रूपये निधी खर्च झालेला आहे. त्याचबरोबर चालू वर्ष 2020-21 मध्ये 5 लाभार्थ्यांना 30 हजार रूपये प्रमाणे एकूण 1 लाख 50 हजार रूपये निधी वाटप करण्यात आला आहे. अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली. त्याचबरोबर शहरातील दिव्यांग व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन नगराध्यक्षा यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच अपंगाना वैद्यकीय खर्चाकरीता निधी उपलब्ध करणे व दिव्यांगाना पेन्शन योजना सुरू करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत 87 लाभार्थ्यांची नोंद नगरपरिषद कार्यालयामध्ये झालेली असून सदरच्या दिव्यांग लाभार्थ्यांना बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला या शाखेत 352 रूपयांचा आरोग्य विमा काढण्यात येणार असून यासाठी 30 हजार 624 रूपये खर्चास सभागृहाकडून यास मंजुरी देण्यात आली आहे. सदरच्या कामासाठी सभाअधीेक्षक शरद माने यांनी विशेष परिश्रम घेवून वेळोवेळी दिव्यांगाना मिळणार्‍या निधीची तसेच लाभाची माहिती घेवून ती सभागृहासमोर मांडण्याचे प्रयत्न केले. 

Post a Comment

0 Comments