google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Breaking सांगोला तालुक्यातील सरपंच , उपसरपंच पदांची निवड नऊ व अकरा फेब्रवारीला - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जवळा , कोळा , महुद बु ।। , नाझरासह ४० ग्रामपंचायतीच् सरपंच , उपसरपंच पदाची निवड नऊ फेब्रुवारीला

Breaking News

Breaking सांगोला तालुक्यातील सरपंच , उपसरपंच पदांची निवड नऊ व अकरा फेब्रवारीला - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जवळा , कोळा , महुद बु ।। , नाझरासह ४० ग्रामपंचायतीच् सरपंच , उपसरपंच पदाची निवड नऊ फेब्रुवारीला

 सांगोला- ( विशेष प्रतिनिधी ) दि .४ सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे . तालुक्यातील ४० ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवार ९फेब्रुवारी रोजी तर २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे .


तालुक्यातील ९ फेब्रुवारी रोजी सरपंच , उपसरपंच निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे जवळा , कोळे , महुद , नाझरे आलेगाव , बामणी , देवळे , अजनाळे , गायगव्हाण , महिम , हनमंतगांव , संगेवाडी , तरंगेवाडी , अचकदाणी , खिलारवाडी , घेर डी , भोपसेवाडी , डोंगरगाव कमलापूर , जुजारपूर , मांजरी , वझरे , मानेगाव , वाणिचिंचाळे , अकोला , राजुरी , उदनवाडी , वाकी शिवणे , कडलास , किडेबिसरी , लक्ष्मीनगर , लोटेवाडी , नराळे , पारे , यल मार मंगेवाडी , तिप्पेहळ्ळी , कटफळ , हटकर मंगेवाडी , पाचेगावं बुद्रुक . ११ फेब्रुवारी रोजी सरपंच , उपसरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणेवाकी घेरडी , गौडवाडी , मेथवडे , लोणविरे , इटकी , हंगिरगे , बुध्देहाळ , वाटंबरे , शिरभावी , जुनोनी , धायटी , डिकसळ , बुरंगेवाडी , वासूद , सोमेवाडी , नि जामपूर , मेडशिंगी , हलदहिवडी , निजामपूर , एखतपूर , चोपडी , आगला वेवाडी या ग्रामपंचायती होत आहेत . निवडून आलेल्या सदस्यांपैकी सदस्य हे सर्वसाधारण जागेवर निवडून येऊन सरपंच पदाच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवू शकतात.त्यामूळे निवडणूकीच्या दिवशी त्यांचेकडे जातपडताळणी समितीकडे जात वैधता प्रस्ताव सादर केलेली पोहोच असणे आवश्यक आहे . सर्वसाधारण जागेवर निवडून येऊन सरपंच पदाच्या आरक्षित जागेचा लाभ घेणार असतील अशा सदस्यांकडून जात पडताळणी समितीकडे पाठवावयाचे प्रस्तावावर स्वाक्षरी करणेकामी सबंधित तालुक्यातील तहसिलदार यांना प्राधिकृत केली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे .

Post a Comment

0 Comments