सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) जिल्हा भाजपच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी तसेच आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील महावितरण कार्यालयास टाळे ठोकून हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली
. सोलापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन काळातील घरगुती , शेती पंप , व्यापारी , लघु उद्योजकांची विज बिले माफ करावीत , मीटर रिडिंग ऐवजी सरासरी बिले देण्यात आली तसेच १ एप्रिल पासून वाढ करण्यात आलेली बिले रद्द करावीत , राज्य सरकारचा १६ टके आधीभाग व वहन कर रख करावा , बीज उत्पादन कंपनीचे ऑडिट करण्यात यावे , या मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर भाजपने राज्यभर बॉबाबॉय आंदोलन व होळीआंदोलन केले . तरीही आघाडी सरकारने न्याय न देता वीज बिले न भरल्यास वीज तोडणी मोहिमेचा घाट घातला आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी वीज वापरली नसली तरीही ५० टके वीज बिल भरावेच लागेल , नाहीतर कनेक्शन तोडू ही भूमिका घेतली आहे . महाराष्ट्रातील ७२ लाख घरगुती ग्राहकांना वीज तोडणीच्या नोटीसा बजावल्या आहेत . आघाडी सरकारने शंभर युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती . त्यामुळे १२ महिन्याचे १२०० युनिट ग्राहकांचे वीज बिल कमी करा , सरासरी वीजबिले दुरुस्त करा , कोरोना काळातील वीज बिले माफ करा याचा विचार करून नव्याने वीज बिल द्या आणि मग दीज तोडणी नोटीसा या अशी मागणी भाजपने केली आहे . भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील , माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व मंडलच्या वतीने महावितरण कार्यालयास टाळे ठोकून आघाडी सरकारचा निषेध म्हणून हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख
0 Comments