google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता थेट तलाठ्याकडून होणार ७-१२ उताऱ्यावर नावाची नोंद

Breaking News

आता थेट तलाठ्याकडून होणार ७-१२ उताऱ्यावर नावाची नोंद

 तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंदचे आदेश , जमीन ,जागा , घर खरेदी केल्यानंतर तहसील कार्यालय वा तलाठ्यांकडे आता हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही .


दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोदंणी कार्यालयाकडूनच ऑनलाइन यंत्रणेद्वारे थेट तलाठ्यांच्या ऑनलाइन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित कागदपत्रे पाठवण्यात यावी . त्यावर तलाठी यांनी १५ दिवसांत फेरफार अर्थातच खरेदी केलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंदकरावी , असे भूमी अभिलेख आधुनिकीकरणाचे समन्वयक रामदास जगताप यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत . नाव नोंद घेण्याच्या प्रक्रियेतील कालावधी कमी करण्यासाठी तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष रद्द करून थेट तलाठी यांच्या लॉगिनलाच नोंदणीकृत दस्त उपलब्ध करून द्यावे . सर्व तहसील कार्यालयांत फेरफार कक्ष १ जुलैपासून बंद करण्यात आले आहेत .१५ दिवसांत नाव नोंद करण्याची मुदत असून मुदतीत तलाठी यांनी नोंद करावी . मुदतीत नोंद न केल्यास तलाठी यांच्याकडे किती नोंदी प्रलंबित आहेत , हे ऑनलाइन प्रक्रियेत तहसीलदार , प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी यांना दिसणार आहे .

Post a Comment

0 Comments