बिग ब्रेकिंग .....पंढरपूर- महूद रस्त्यावर अपघातात तीन जागीच ठार !पंढरपूर- चिक महूद दरम्यानच्या रस्त्यावर झाला तिहेरी अपघात आणि तिघे जण जागीच ठार पंढरपूर - कराड मार्गावरअपघातात तिघे ठार ! पंढरपूर : पंढरपूर कराड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले असून यात पंढरपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार पंढरपूर- कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद पाटीजवळ तिहेरी अपघात झाला असून या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहेत तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.दोन मोटार सायकल आणि ट्रक्टर अशा तीन वाहनांचा हा अपघात असून या अपघातात मयत झालेले दोघे म्हसवड तालुक्यातील देवापूर येथील असून एक जण पंढरपूर तालुक्यातील आहे. आणखी जखमी असलेले दोघे जण हे देखील पंढरप्रूर तालुक्यातीलच असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. या अपघाताबाबत अधिक तपशील अद्याप हाती आला नाही.


0 Comments