सांगोला : सांगोला पोलिस स्टेशनमध्ये नव्याने पोलिस निरीक्षक पदावर रुजू झालेले भगवान निंबाळकर यांनी शहर व तालुक्यातील गुंडगिरी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाही
, असे सांगून नवीन पद्धतीने शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली आहे . शहरात विविध चौकात सांगोला पोलिसांनी सूचना फलक लावला आहे . या फलकाची नागरिकांमधून जोरात चर्चा सुरू आहे . शांतताप्रिय लोकांमधून अपेक्षा वाढल्या आहेत . खरेतर जनता विना वर्दीतील पोलिस असते यांच्यात सर्वसामान्य जनता आणि पोलिस यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे . सांगोला तालुक्यातील जनता व राजकीय पक्षांचा विचार करता नेहमीच उपद्रव कमी आणि राजकीय शांतता | दिसून येते . वारंवार मोर्चे , आंदोलने , उपोषण आदी सांगोला तालुक्यात |इतर तालुक्याच्या मानाने जास्त नाहीत . परंतु याचे दुष्काळी तालुक्यात सांगोला तालुक्यात बेकायदेशीर धंदे व वाळू व्यवसाय नेहमी जोरात चर्चेत असतात . दुष्काळाकडून विकासाकडे घोडदौड करणाऱ्यासांगोला तालुक्यात अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे अनेक वेळा कारवाई वरून दिसून आले आहे . दुष्काळ म्हणून वर्षानुवर्षे टाहो फोडणाऱ्या तालुक्यात बेकायदेशीर धंदे समाजहिताचे नाहीत . याबाबत अनेकवेळा फक्त आत्मचिंतन केले जाते.पण प्रत्यक्षात मात्र ठोस काही केले जात नाही . परत असे धंदे सुरू होतात . पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगोला पोलिस स्टेशनचा पदभार घेतला आणि त्याचदिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितले की , गुंड वगुन्हेगारांची गय केली जाणार नाही . यापुढे जाऊन आतापोलिसांनीसांगोला शहरातील विविध चौकात चक्क गुंडांना अनेक गुन्हेगारांना सावधान होण्याचा इशारा दिला आहे . तसेच सावकारकी , दमदाटी , फसवणूक , लुबाडणूक , लूट , सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे , वाढदिवस साजरा करणे , गोंधळ घालणारे व वाहतुकीसंदर्भात नियम याबाबतचा सूचना फलक लावला आहे . पोलिस आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण झाल्यास तालुक्यातून गुंडगिरी हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही .


0 Comments