सांगोला ( प्रतिनिधी ) : - कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे , शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा आदी मागण्यासाठी भाजपच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी टेंभुर्णी येथे वीज वितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात आले .
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की , सत्तेतील तिघाडी सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली होती.महापूरात शेती वाहून गेली , कोरोना काळात शेतीमालास भाव मिळाला नाही . दूध दर कोसळले.यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.याकडे लक्ष देण्यास अपघाताने सत्तेवर आलेल्या तिघाडी सरकारकडे वेळ नाही.यामुळे सरकारचे डोके आणण्यासाठी आजचे वीज कार्यालयास ' टाळे ठोक आंदोलन ' करण्यात आले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.यावेळी देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेस , राष्ट्रवादी यांच्यात मेळ दिसत नाही.यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे असे सांगत वीजबिल माफ करा अशी जोरदार मागणी केली . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे , मदन मुंगळे , मस्के यांची ही भाषणे झाली . यावेळी भाजपचे गोविंद कुलकर्णी , जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे , कोषाध्यक्ष सुरेश पाटील , रत्नाकर कुलकर्णी , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक , विठ्ठल मस्के , गिरीश तावे , राजाभाऊ खट के , नागनाथ वाघे , परमेश्वर खरात , जयवंत पोळ , विष्णू विचकुले , विकास धोत्रे , औदुंबर भागवत , बाळासो ढगे , सागर ढवळे , दत्ता ढवळे , सुभाष इंदलकर , राहुल चव्हाण , नारायण गायकवाड , मगन महाडिक , विजय कोकाटे , विजय महासागर , करण भगत , धनश्री खटके , शोभा खटके , वृंदावनी खटके , राणी खटके , मनीषा खटके , शेशाबाई मस्के , नयना कांबळे , अनिता कांबळे , अनिता लोंढे , तनुजा तांबोळी , सुरेखा इंदलकर आदीजन उपस्थित होते .


0 Comments