सांगोला ( प्रति निधी ) : सांगोला - पंढरपूर नवीन सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी , अद्याप शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही . दरम्यान , या रस्त्यासाठी भूसंपादन के लेल्या जमिनीचा मोबदला त्वरित न मिळाल्यास २८ फेब्रुवारी रोजी सांगोला - पंढरपूर रस्त्यावरील संगेवाडी गावाजवळ नवीन होणाऱ्या टोल नाक्याजवळ शेतकरी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत
, याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे . पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्यासिमेंट काँक्रिट करण्याचे कामकाज पूर्णत्वाकडे आले आहे . या रस्त्यासाठी मांजरी हद्दीमधील नवीन होणाऱ्या टोल नाक्याचेही कामकाज पूर्णत्वाकडे आले आहे . परंतु अद्याप या रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाची रक्कम शेतक - यांना मिळाली नाही . शेतकऱ्यांनी नवीन रस्ता सुरू करताना कामकाज बंद पाडले होते . त्या वेळी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या वेळचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा प्रश्न सोडवला जाईल व संपादित जमिनीचा मोबदलाहीनिश्चित मिळेल असे सांगून नवीन होणाऱ्या रस्त्याचे कामकाज थांबवू नये , असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते . त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी सहकार्य केले . परंतु , हा रस्ता पूर्णत्वाकडे आला तरीसुद्धा अद्यापही भूसंपादनाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही . त्यामुळे भूसंपादनाची रक्कम त्वरित मिळण्यासाठी या रस्त्यावरील सर्व बाधित शेतकरी एकत्र येऊन २८ फेब्रुवारी रोजी मांजरी हद्दीतील नवीन होणाऱ्या टोल नाक्याजवळ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत .या रस्त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या , परंतु रस्त्यावरील पंढरपूर जवळील वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याचा रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही . त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाची रक्कम न देता रस्ता पूर्ण केला , परंतु वनविभागाची यासाठी परवानगी मिळाली नसल्याचे समजते . शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु सरकारच्या जमिनीवर रस्ता करण्यासाठी परवानगी मिळेना , अशी अवस्था झाली आहे .


0 Comments