
सांगोला पोलीस ठाणे चा चार्ज नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घेतला आहे . सांगोला पोलीस ठाणे हददीत काही गुंड प्रवृत्तीचे लोकांमध्ये नविन फॅड निर्माण झाले आहे . रस्त्यावर चौकात , सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणे , वाढदिवस साजरे करणे , हुल्लडबाजी करणे ही प्रवृत्ती गुन्हेगारीकडे जाण्याची आहे . अशातच हलदहीवडी अजिंक्यतारा हॉटेल या ठिकणी अफसर बालीखान शेख वय २२ , रा . नागज , ता . कवठेमहांकाळ हे त्याचे पाहुणे मुबारक हिरालाल शेख वय ३२ , रा . हलदहीवडी यांचेकडे वाढदिवस साजरा करणेसाठी आला होता . त्यांनी दि . १४/०२/२०२१ रोजी हॉटेल अजिंक्यतारा या ठिकाणी तलवारीने केक कापुन त्याचे फोटो काढुन साजरा केला . केक कापल्याचे फोटो ऑटसअप , फेसबुक इ . ठिकाणी व्हायरल झाले ती माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यानी आर्म अॅक्ट ४/२५ , महा . पो . का . कलम ३७ ( ३ ) / १३५ प्रमाणे दि . १५/०२/२०२१ रोजी गुन्हा दाखल करून . १. अफसर बालीखान शेख , वय २२ वर्षे , रा . नागज , ता . कवठेमहांकाळ , २. मुबारक हिरालाल शेख वय ३२ , रा . हलदहीवडी , ता . सांगोला , ३. रफिक पैगंबर शेख , वय २५ , रा . सदर , ४.अब्बास कमाल शेख , वय ३३ , रा . सदर , ५. दिलावर बाबासाो शेख , वय ३५ , रा . सदर , ६. अनिस उर्फ बाबासो कमाल शेख , वय ३० , रा . सदर , ७ . चाँद राजु शेख , वय १ ९ , रा . सदर , ८.अजित मकबुल शेख वय २१ , रा . ढाळेवाडी ता . सांगोला ९.फिरोज पैगंबर शेख , वय २३ , रा.हलदहीवडी , ता . सांगोला १०.शिवाजी मच्छिंद्र लेडवे , वय ३२ , रा . सदर , ११. विक्रम सदाशिव गायकवाड , वय ४० रा . सदर यांना अटक करण्यात आली व लॉकअपमध्ये टाकण्यात आले . हॉटेल अजिंक्यतारा यांचेवरही कारवाई करण्यात येणार आहे . सांगोला तालुक्यात १०३ गावे आहेत हया तालुक्यात यापुढे रस्त्यावर चौकात इ . सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणे किंवा केक कापुन हुल्लडबाजी करणे भविष्यात अशा प्रकारचे कृत्य जर केले तर त्यांचेवर गुन्हे दाखल करून अटक करून रिमांड घेवुन जेलमध्ये पाठविण्यात येईल . त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली जाईल वेळप्रसंगी त्यांना तालुक्यातुन जिल्हयातुन तडीपार केले जाईल यापुढे अशाप्रकारचे प्रकार झाले तर नागरिकांनी पोलीस ठाणेस माहिती देण्यात यावी त्यांची माहिती गोपनिय ठेवण्यात येईल व आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणाचीही गय केली जाणार नाही . पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले आहे . सदर उल्लेखनीय कामगिरी मा . दत्तात्रय पाटील सो , उपविभागिय पोलीस अधिकारी मंगळवेढा व मा . भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि यमगर पोलीस अंमलदार पोहेकॉ / १६४० पवार , पोना / १७८३ पर्वते , पोकॉ / देशमुख यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोना / १७८३ संदिप पर्वते हे करीत आहेत .
0 Comments