google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, महिला सदस्यांची आत्महत्या !

Breaking News

सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, महिला सदस्यांची आत्महत्या !

 सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, महिला सदस्यांची आत्महत्या !

अखेर असतं तरी काय या सरपंच पदात कोण जाणे ! पराभव झाला म्हणून महिला सदस्यांनी संपवलं आपलं जीवन ! दुख:द घटना !!

सरपंचपद मिळालं नाही

सदस्याची आत्महत्या!


कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस असते इथवर ठीक आहे पण सरपंचपदी वर्णी लागली नाही म्हणून एका ग्राम पंचायत महिला सदस्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. 

  देशभरात होणाऱ्या निवडणुकात ग्रामपंचायत निवडणूक ही सर्वाधिक चुरशीची असते, गावाचा सरपंच होण्यात अनेकांना स्वारस्य असते पण त्यासाठी कुणी आपल्याच हाताने आपला जीव गमावेल हे मात्र धक्कादायक आहे. चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि या निवडणुकीत ३२ वर्षांच्या  याल्लुबाई मारुती गावडे या ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडूनही आल्या. नंतर त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणी  त्या सरपंच होऊ शकल्या नाहीत. निवडणुकीत कुणीतरी जिंकतं, कुणीतरी पराभूत होत असतं. पराभवही खिलाडूपणे स्वीकारायचा असतो असं म्हटलं जातं. यल्लुबाईने मात्र हा पराभव खेळकरपणे घेतला नाही. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्या प्रचंड निराश झाल्या. 

  मुलीची निराशा लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी यल्लुबाईस माहेरी म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील माणिकेरी येथे बोलून घेतले. त्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला खरा पण तो पुरेसा ठरला नाही. माहेरी आल्यानंतर यल्लुबाई गावडे यांनी रात्रीच्या वेळेस विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. आपल्या प्राणापेक्षा सरपंचपद मोठे ठरले होते. ही घटना बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वाना चटका लाऊन गेली.  

Post a Comment

0 Comments