पंढरपूरः पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समता पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली , यामध्ये नवीन पदाधीकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . यावेळी पार्टी वाढीसाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली .
यामध्ये या भागातील होणारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या या नवीन पार्टीचा उमेदवार उतरून निवडणूक लढविण्याची घोषणा यावेळी प्रा मच्छिद्र सकटे यांनी केली आहे . हा उमेदवार कोण असेल हे अद्याप अस्पष्ट असले तरी पार्टीच्या उमेदवार प्रचाराचा एक भाग म्हणूनच येत्या १ मार्च दिवशी क्रांतिवीर फकिरा राणोजी साठे यांच्या जयंतीनिमित्ताने या मतदार संघातून एक जनसंवाद यात्रेस सुरुवात करणार असल्याचेप्रा . सकटे यांनी सांगितले . या जनसंवाद यात्रातून प्रत्येक गावातील लोकांना या नवीन पार्टीची ध्येय धोरणे पटवून देण्यात येणार आहेत . पंढरपूर हे नुसतं देवभूमीच नाही तर समता भूमीही आहे . यामधील वंचीतामधील वंचितलाही यामध्ये सोबत घेऊनच ही लढाई करणार असल्याचेही यावेळी सांगितले . सदरची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या नावाची घोषणा ही आली , यामध्ये मोहोळ तालुका अध्यक्ष पदी राम नागनाथ माने , सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी दगडू यादव , पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी बाजीराव शंकर बंडगर , माळशिरस तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत नाईकनवरे , सांगोला तालुका अध्यक्षपदी पांडुरंग यादव , सोलापूर आणि पंढरपूर संपर्क प्रमुखपदी बळीराम रणदिवे , रवळ विविध भागांतील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी राजाभाऊ खिलारे , सुनील अवघडे , रमेश कांबळे , किशोर जाधव , फुलाबाई रणदिवे , छाया पवार , प्रमोद खनदारे , संपत अवघडे , श्रीमंत मस्के , धनाजी शिवपालक , अमोल खिलारे , मसुदेव काळे , भारत फाळके , चंद्रकांत सरडे , बाळासाहेब पाटील , संतोष रणदिवे , यांच्या सह दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments