राज्यात यात्रा आणि उरूस यांचा हंगाम सुरू झाला आहे . मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या यात्रा आणि उरूस यांना ८ महिने बंदी होती . आता साथीच्या रोगांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे , सातारा , सांगली , सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील ग्रामीण व पंचायत पातळीवरील यात्रा आणि उत्सव आणि उरूस यांना परवानगी देण्यात आली आहे .
ज्या यात्रेला आणि उरुसांना प्रचंड गर्दी होते , त्या यात्रा आणि उरुसांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आराखडा प्राप्त होताच परवानगी देण्याचा विचार करण्यात येणार आहे . गाव आणि तालुका पातळीवरच्या या उरुस आणि यात्रा दरम्यान मुलांची खेळणी , मनोरंजनाचे पाळणे , भेळ , मेवा , मिठाई , नारळ , कापूर , इमिटेशन जरठी , कटलरीइत्यादी प्रकारचे स्टॉल यात्रेमध्ये लावण्यास परवानगी देण्यात आली आहे . अशा यात्रा आणि उरूसांना परवानगी देण्यात यावी आणि त्यात जत्रे चे सामान आणि मनोरंजनाची साधने ठेवण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे पत्र पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनने राज्य सरकारला २ जानेवारीला पाठविले होते . त्यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा आणि ऊरूस सुरू करण्याची विनंती केली होती . दहा विनंतीचा विचार करून सामान्य प्रशासन खात्याच्या पुणे विभागाचे उपायुक्त संतोष पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात ग्राम आणि पंचायत पातळीवरील यात्रा आणि उरूस यांना परवानगी दिली आहे . यापेक्षा मोठ्या यात्रांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची योजना सादर केल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्यात येणार आहे .


0 Comments