सांगोला ( प्रतिनिधी ) : - कोरोनाचा संसर्ग कमी झालाय ... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झाल्यामुळे मला काय होतय ... गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये आपण सगळे याच अविर्भावात होतो . सगळे गाफील राहिलो आणि बघता बघता उद्रेक झाला . आरोग्य यंत्रणा कोलमडली , परिस्थिती हाताबाहेर गेली . उपचार मिळेनात
, रुग्णालयात वेड मिळेना अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायची नसेल , तर मास्क लावा आणि शारीरिक अंतर ठेवा ... कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय ! सांगोला शहर व परिसरात कोरोनाची स्थितीसामान्य आहे . रुग्णाची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी होत गेली आहे . त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्व नागरिक विनधास्त झाले आहेत . आता कोरोना संपला , लस आलेली आहे , आता आपणाला काही होणार नाही असाच समज सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांचा झाला असल्याचे चित्र सध्या बाजारात फिरताना दिसून येत आहे . परंतु हा समज काहीसा आत्मघातकी ठरू शकतो . कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपलेला नाही . धोका आजही कायम आहे.त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे .जगाच्यादृष्टीने वाईट ठरलेले २०२० साल संपले , त्यालाही दीड महिना झाला . लस निघाल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल असे सगळ्यानाच वाटत होते . मात्र हा विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचे राज्यातील काही शहरांतून दिसून येत आहे . मुंबईसह अनेक शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे तेथील प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे . नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत .


0 Comments