सांगोला ( प्रतिनिधी ) : - कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय नाही . शासनाने व्यापारी बांधवांचे चक्र बंद ठेवले तर व्यापारी बांधवांच्या अनेक अडचणी वाढतील . व्यापारी बांधव आर्थिक संकटात अडकून राहतील त्याचबरोबर जे लोक यावर अवलंबून आहेत ,
त्यांची उपासमार होईल , त्यामुळे अन्य दुसरे पर्याय निवडावेत , अशी मागणी सांगोला शहर व परिसरातील छोट्या मोठ्या व्यापारी बांधवामधून जोर धरु लागली आहे . कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढूलागली असल्याने लॉक डाऊन होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे . संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे . आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार , या भीतीमुळे सर्वांच्या पोटात गोळा आलेला आहे . बँकांनी त्यांच्या पाठीमागे कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे . बँकांनी पुन्हा एकदा वसुली सुरू केली आहे . उद्योग बंद झाले तर अनेक अडचणी निर्माण होतील त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यावा , अशी मागणी होत आहे . सांगोला तालुक्यात कोरोना महामारी झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे . कोरोना महामारीमुळे सांगोला तालुक्यातील छोटे व्यापारी अडचणीत सापडले आहेत . या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे बँकाचा कर्ज वसुलीसाठी पाठपुरावा सुरू झालेला आहे . लॉक डाऊन केल्यास व्यापारी बांधवांपुढे अडचणी वाढतील . सर्व व्यापाऱ्यांनी येणाऱ्या सर्व ग्राहकांची काळजी घेऊन नियम पाळल्यास कोरोना महामारी थांबू शकेल . त्यामुळे सर्वानी शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे .


0 Comments