google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निर्भया पथकाने नजर ठेऊन जेरबंद केला रोड रोमिओ करीत होता छेडछाड ! निर्भया पथकाने ठेवली नजर आणि सापडला रंगेहात !

Breaking News

निर्भया पथकाने नजर ठेऊन जेरबंद केला रोड रोमिओ करीत होता छेडछाड ! निर्भया पथकाने ठेवली नजर आणि सापडला रंगेहात !

 निर्भया पथकाने नजर ठेऊन जेरबंद केला रोड रोमिओ करीत होता छेडछाड ! निर्भया पथकाने ठेवली नजर आणि सापडला रंगेहात !

'निर्भया'ने ठेवलीनजर मग धरला रोड रोमिओ

पंढरपूर : मुलीची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरीवर निर्भय पथकाने आधी 'नजर' ठेवली आणि नंतर त्याला तुरुंगाचा रस्ता दाखविण्यात आला. गच्चीवरून नखरे करणाऱ्या रोमिओची तर पुरती जिरलीच पण इतर सडकछाप प्रेमवीर या कारवाईने हादरून गेले आहेत. पंढरीत सडक छाप हिरोंचे प्रताप खूप आधीपासूनच आहेत, पोलिसांनी कधी थेट त्यांच्याविरोधात मोहीम उघडली की काही दिवसांपुरते हे रोमिओ बिळात जाऊन बसतात आणि पुन्हा हळूच बाहेर येतात. निर्भय पथकांच्या स्थापनेपासून सडक छाप रोमिओ काहीसे कमी झाले आहेत पण त्यातूनही काही हळूच तोंड काढून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. असाच एक रोड रोमिओ निर्भया पथकाच्या नजरेस पडला आणि गजाआड जाऊन बसला.  पंढरीतील संजू खडके हा एका पिडीतेला सतत असाच त्रास देत असल्याची तक्रार निर्भय पथकाकडे आली आणि  हे पथक सज्ज झाले. गच्चीत उभे राहून त्याचे हे प्रताप सुरु होते. पिडीतेच्या घरात डोकाऊन पाहत राहणे, तिच्या दिशेने कागदी बोळे फेकणे, अश्लील हावभाव करणे, याशिवाय ती कुठे बाहेर गेली की तिचा पाठलाग करीत राहणे असे त्याचे 'उद्योग' सुरु होते. या सगळ्या प्रकाराला संपूर्ण कुटुंब त्रासून गेले होते. अखेर निर्भया पथकाकडे याची तक्रार करण्यात आली आणि हे पथक मग आपल्या पद्धतीने कामाला लागले. निर्भया पथकाचे प्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या आणि या सडक सख्याहरीवर नजर ठेवण्यास सांगितले. पिडीता आपल्या घराबाहेर पडली असता पुन्हा या 'हिरो' ने तिचा पाठलाग केला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. हे चित्र निर्भया पथकाला पाहायला मिळाले. हा रोमिओ तिला धक्का मारून पुढे गेल्याचेही दिसून आले. परत येऊन त्याने पुन्हा पाठलाग चालू केला आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागला. हा सर्व प्रकार निर्भया पथकाने कॅमेऱ्यात टिपला. आणि नंतर रंगेहात पकडत त्याला गजाआड केला एका पीडितेला तिच्या घरा शेजारी राहणारा एक रोमिओ टेरेस वर उभे राहून सतत त्रास देत होता. टेरिस वर उभे राहून एकटक बघणे,  कागदी गोळे फेकणे,तिच्या घरात डोकावून बघणे, पीडित महिला कुठे बाहेर गेले असता तिचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे,शिवीगाळ करणे,  असे प्रकार वारंवार करून पीडित महिलेस वारंवार संजू खडके हा  त्रास देत होता.  याला कंटाळून पीडित महिलेच्या कुटुंबाने निर्भय पथकाकडे  तक्रार केली. त्यानंतर पथक  प्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी पथकातील टीमला त्या रोमिवर लक्ष  ठेवण्यासाठी सांगितले.  सदर पीडित महिला आपल्या  घराबाहेर कामानिमित्त पडली असता त्या रोमियोने  तिचा  पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला,  घराबाहेर पुढे जात असताना तिला पाठीमागून धक्का मारून पुढे निघून गेला, पुढे जाऊन परत गाडीवरून तिचा पाठलाग करत  , तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे निर्भय पथकातील पोलिसांना दिसले. तेव्हा छेडछाड करतांना त्या रोमियोला रंगेहात जागेवर पकडले.या घटनेचे शूटिंग निर्भया पथकाने केले.उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर,पोलीस कर्मचारी  अरबाज खाटीक, गणेश इंगोले, महिला पोलीस  कुसुम क्षीरसागर , चंदा निमंगरे, नीता डोकडे, चालक अविनाश रोडगे यांनी कौशल्याने ही कामगिरी केल्याने एक सडक सख्याहरी तुरुंगात जाऊन बसला तर इतरांना याची चांगलीच जरब बसली. संजू रामचंद्र खडके याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निर्भय पथकाचे पंढरीत कौतुक होत असून महिलांना सुरक्षिततेची हमी या पथकामुळे मिळू लागली आहे.   

Post a Comment

0 Comments