google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 " त्या ' वृध्द महिलेला जिवंत जाळले नसून तो एक अपघात ! सांगोला पोलीसांचा खुलासा

Breaking News

" त्या ' वृध्द महिलेला जिवंत जाळले नसून तो एक अपघात ! सांगोला पोलीसांचा खुलासा

 सांगोला (साप्ता. शब्दरेखा एक्सप्रेस) : घरात अचानक आग लागून एका वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची घटना सांगोला येथील सूत गिरणी समोर गुरुवारी ( ता . 4 ) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली . शरिफा खुर्शीद पठाण ( वय 70 , रा . सूत गिरणीच्या गेट समोर , सांगोला , ता . सांगोला ) असे आगीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे


. मात्र या घटनेनंतर तालुक्यात उलटसुलट अफवा पसरल्या असून , त्या वृद्धेला जिवंत जाळून ठार मारल्याच्या चर्चा सुरू होत्या .याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की , शरीफा खुर्शीद पठाण या सूतगिरणीच्या गेटसमोर येथे एकट्याच राहात होत्या . त्यांच्या घरात वीजही नव्हती . उजेडासाठी कंदील व स्वयंपाक त्या चुलीवर करत होत्या . गुरुवारी 4 फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शरीफा पठाण यांच्या घरास आग लागली . त्या अगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून गेले व त्या स्वतः जळून त्यांचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला . मृताचे नातेवाईक मुलगी शाहिरा आलम शेख ( रा . मंगळवेढा ) यांना या घटनेची खबर देण्यात आली . याबाबत सांगोला पोलिसात अचानक आग लागून घरामध्ये असलेल्या शरीफा खुर्शीद पठाण यांचा भाजून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.मात्र या घटनेनंतर उलटसुलट अफवा पसरवण्यात आल्या . काही प्रसारमाध्यमांमधून सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने त्या वृद्धेचे घर पेटवून तिला जिवंत पेटविल्याची बातमी प्रसिध्द झाली . यांमूळे उलट सुलट चर्चांना उत आला होता.मात्र , सांगोला पोलीसांनी हे वृत्त खरे नसून अफवा असल्याचा खुलासा केला आहे . या घटनेमध्ये काही अफवा पसरल्या आहेत . याबाबत घर जळाल्याने वृध्द महीलेचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे . या मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल . राजेश गवळी - पोलीस निरिक्षक , सांगोला

Post a Comment

0 Comments