google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात हॉटेल मालकाची 30 हजारांची फसवणूक

Breaking News

सांगोला तालुक्यात हॉटेल मालकाची 30 हजारांची फसवणूक

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून वस्तादाने कामासाठी ३० हजार रुपये घेऊन गेल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली .


ही घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सोनंद ता.सांगोला येथे घडली असून याप्रकरणी शशिकांत येजमाने रा.कुमठा नाका , सोलापूर याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . याबाबत अधिक माहिती अशी , सोनंद ता.सांगोला येथील अनिल पितांबर गौड यांचे हॉटेल व मोटरसायकलच्या गॅरेजचा व्यवसाय आहे . २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शशिकांत येजमाने रा.कुमठा नाका , सोलापूर हा त्या ठिकाणी येत मी निरंकारी असून मला हॉटेलचा व्यवसाय जमतो , मला एक दिवस राहू द्या असे सांगत त्याने मालकाला समोसा कसा करायचा शिकवून विश्वास संपादन केला . त्यानंतर गौड यांनी ५ हजार रुपये दिल्यानंतर २ झारे , २ कढई , शेगडी , प्लेट , चमचा असे साहित्य येजमाने घेऊन आला . हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून शशिकांत येजमाने हा स्वतःच्या कामासाठी गौड यांच्याकडून ३० हजार रुपये घेऊन गेला . जाताना त्याने एमएच ० ९ सिटी ८४३३ या क्रमांकाची दुचाकी तेथेच ठेवून गेला , मात्र तो परत हॉटेलकडे फिरकलाच नाही . त्यानंतर अनिल गौड यांनी फोनवरून येजमाने यांच्याकडे पैशाची मागणी केली , मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली . याप्रकरणी अनिल गौड यांनी शशिकांत येजमाने याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Post a Comment

0 Comments