.मनुष्यहानी देखील झाली होती. याचवेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले होते . प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेऊन देखील अजय यांचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे बार्शी पोलिसात अजय यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होती . मात्र धक्कदायक बाब म्हणजे तब्बल ४ महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला आहे .बार्शी शहराजवळील एका शेतालगत असलेल्या ओढ्यात काटेरी झाडांमध्ये एक मानवी सांगाडा अडकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले .
पोलिसांना हा सांगाडा पुरात वाहून गेलेल्या अजय यांचाच असल्याची शंका आली . त्यावरुन त्यांनी अजय यांच्या पत्नीला घटनास्थळावर बोलावून घेतले . अजय यांच्या पत्नी आपल्या सासू,दीर यांच्यासमवेत घटनास्थळी पोहोचल्या . मानवी सांगाड्याच्या मानेच्या हाडाला शर्टचा तुकडा अडकलेला होता . याच शर्टच्या तुकड्यावरुन सापडलेला मानवी सांगाडा हा पुरात वाहून गेलेल्या अजय यांचाच असल्याचा जबाब मयताची पत्नीं यांनी पोलिसांना दिला आहे .
तसेच सांगाड्याची बांधणी पाहता सागांडा पती अजय यांच्या शरीरयष्टीची मिळता जुळता आहे . त्यामुळे ओढ्यामध्ये सापडलेला सांगाडा पतीचाच असून ते मयत झाले असल्याबाबत खात्री झाली असल्याचा जबाब मयत अजय यांच्या पत्नीने बार्शी पोलिसात दिला आहे . अजय चौधरी हे १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास बार्शीतील तुळजापूर रोड रेल्वे पुलाजवळील ओढ्यातून पाण्यात वाहून गेले होते . अजय हे बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होते . घरचा कर्ता माणूस गेल्याने परिवारावर शोककळा पसरलेली होती. तब्बल ४ महिन्यांनी त्यांचा सांगाडाच हाती लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
0 Comments