google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर ; 12 चिमुरड्यांना केले रुग्णालयात दाखल

Breaking News

धक्कादायक : पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर ; 12 चिमुरड्यांना केले रुग्णालयात दाखल

 धक्कादायक : पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर ; 12 चिमुरड्यांना केले रुग्णालयात दाखल


यवतमाळ : राज्यात पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली असून पाच वर्षांखालील चिमुरड्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा प्रकार यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी घडला. पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 12 लहान बालकांना दाखल करण्यात आले आहे. मुलांना सुरुवातीला उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments