google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट

Breaking News

Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट

 Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट


मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तात्काळ कार्यवाही करत प्रशासनाने सात पथकांद्वारे पोल्ट्रीच्या एक किमी परिसरातील ७५३ पक्षी व ११० अंडी रात्री उशिरापर्यंत नष्ट केली.

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशूधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा पशूधन उपायुक्त नानासाहेब सोनावणे, सहायक पशूधन आयुक्त डॉ.प्रमोद बाबर, पशूधन विकास अधिकारी गोविंद राठोड, पशूधन अधिकारी ब्रम्हानंद कदम यांच्यासह मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला येथील पशूसवंर्धन विभागाच्या सात पथकाव्दारे पीपीई किट वापरुन या कोंबड्या नष्ठ करण्यात आल्या.

परिसरातील कोंबड्या शेतकन्यांनी सकाळी सोडल्या होत्या. त्यामुळे पथकाला संध्याकाळपर्यंतची प्रतिक्षा करावी लागली. मृत कोंबड्या पिशवीत भरुन जेसीबीने खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकल्या.

दरम्यान , प्रशासनाने या परिसरात एक किमीत असलेल्या कोंबड्याचे सर्वेक्षण केले. या रोगाचा प्रसार वाढू नये, या दृष्टीने तलाठी, ग्रामसेवक , पोलिस पाटील यांच्या माध्यमातून जनजागृती केली. जंगलगी येथील पोल्ट्रीतील कोंबड्या बर्ड फ्लूने मृत झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १० किमीचा परीसर अलर्ट झोन जाहीर करत कोंबड्यांची वाहतूक , पक्षी खाद्य , अंडीची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते.

जंगलगी , सलगर बु , सलगर खु , आसबेवाडी , लवंगी , बावची , चिक्कलगी , शिवनगी ही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली होती.

प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. येथील ७५३ पक्षी व ११० अंडी रात्री उशिरापर्यत नष्ठ करण्यात आली.

जंगलगीचे लोन मारापुरात

दरम्यान, जंगलगी येथे सुरु झालेले लोन आता मारापुरात आले असून बर्ड फ्लू सदृश्य आजाराने पाच शेतकऱ्यांच्या १७ कोंबड्या मृत झाल्या असून त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या. त्याच्या अहवालानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments