google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चेतनसिंह केदार - सावंत यांच्या नेतृत्वाखाली वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व सांगोल्याच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या ताब्यात पहिली ग्रामपंचायत

Breaking News

चेतनसिंह केदार - सावंत यांच्या नेतृत्वाखाली वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व सांगोल्याच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या ताब्यात पहिली ग्रामपंचायत

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीलेल्या वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री जय हनुमान विकास आघाडीच्या पॅनलने भाजपचा झेंडा फडकवला आहे . ११ पैकी सहा जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे . सांगोला तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे . सर्वच राजकीय पक्षांनी वासूद ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठेची केली होती . या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री जय हनुमान विकास आघाडीच्या पॅनलसमोर शेकाप , राष्ट्रवादी , शिवसेना यांच्या जय हनुमान महाविकास आघाडी पॅनलने आव्हान दिले होते . या अटीतटीच्या लढतीत चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली ६ जागा जिंकत भाजपने वासूद ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे


. भाजपचे तालुकाध्यक्ष केदार - सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जनतेने विश्वास दाखवला आहे . वासूद ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल ( बंडू ) जगन्नाथ केदार , बबन रामचंद्र ऐवळे , अंकुश शामराव खटके , कलावती संदीपान केदार , विठाबाई शिवाजी चव्हाण , जयश्री अरुण केदार यांनी विजय मिळवला आहे . सांगोला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भाजपने वासूद ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवत आपले खाते उघडले आहे . विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला .

Post a Comment

0 Comments