सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला | तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर ३० पेक्षा जास्त | ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व प्राप्त केले आहे
. तर इतर १० ग्रामपंचायतीमध्ये इतर पक्ष व गटांबरोबर आघाडी करुन काही ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या | माध्यमातून वर्चस्व स्थापित केले आहे . एकूण या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार | पक्षाने स्वबळावर पक्षाचा बालेकिल्ला आणखीन मजबूत केला असल्याचे या निवडणुक निकालावरुन स्पष्ट | झाले आहे . तर या पुर्वीच सर्वांनुमते तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत . या निवडणुकीचे वैशिष्ट | म्हणजे यंदा प्रथमच भाजपाने स्वबळावर वासूद सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकाविला आहे . काही गावांमध्ये | राष्ट्रवादी - शिवसेना , शेकाप - शिवसेना ,राष्ट्रवादी - शेकाप , राष्ट्रवादी - भाजप , भाजप - शेकाप युतीने काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळाले आहे . तर राजुरी ग्रामपंचायतीवर दत्तात्रय व्हळगळ यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष गटाने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या आहेत . तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिपकआबा साळुखे - पाटील यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे . शुक्रवार दि .१५ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या ५३ ९ जागांसाठी अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान पार पडले . त्याची मतमोजणी काल सोमवारी सांगोला शहरातील अहिल्यादेवी सभागृहात संपन्न झाली . सकाळी ८.३० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला . सुरुवातीस पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठीचे झालेले पोस्टल मतदानाची मोजणीकरण्यात आली होती . त्यांनतर अचकदाणी , लक्ष्मीनगर , भोपसेवाडी , तरंगेवाडी , आगलावेवाडी , बुरंगेवाडी , बुध्देहाळ , किडेबिसरी या गावच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली . साधारणपणे पाऊण तासात निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला . त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये नराळे ( हबिसेवाडी ) , डिकसळ , ह.मंगेवाडी , राजुरी , मानेगाव , निजामपूर , देवळे , बामणी , हलदहिवडी , तिसऱ्या फेरीमध्ये हणमंतगाव , लोणविरे , खिलारवाडी , लोटेवाडी , धायटी , मांजरी देवकतेवाडी तर चौथ्या फेरीमध्ये गौडवाडी , सोमेवाडी , पाचेगाव बु , य.मंगेवाडी , वासुद या गावांची मतमोजणी करण्यात आली . पाचव्या फेरीमध्ये वाकी शिवणे , एखतपूर , जवळा , या गावांचीमतमोजणी करण्यात आली . सहाव्या फेरीमध्ये अकोला , हंगिरगे , पारे , हातीद , जुजारपूर या गावाच्या ग्रामपंचायतीची , सातव्या फेरीमध्ये अजनाळे ( लिगाडेवाडी ) , नाझरा ( सरगरवाडी ) , वझरे , कटफळ , महिम या गावांची मतमोजणी करण्यात आली . आठव्या फेरीमध्ये संगेवाडी , शिरभावी , मेडशिंगी , बाकी घेरडी , उदनवाडी , आलेगाव तर नवव्या फेरीमध्ये कमलापूर , जुनोनी , घेरडी , वाणी चिंचाळे या गावांची मतमोजणी करण्यात आली . दहाव्या फेरीमध्ये महूद , इटकी , डोंगरगाव या गावची तर शेवटच्या फेरीमध्ये कडलास आणि कोळा गावाची मतमोजणी पार पडली . मतमोजणी प्रक्रिया दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान पूर्ण झाली . सकाळी ९ .३० वाजलेपासून प्रत्येक गावाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी निवडणूक निर्णय जाहीर केली जात होती . यावेळी मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभा असलेल्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत एकच जल्लोष केला . गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते . तालुक्यातील काही किरकोळ प्रकार वगळता सर्व गावात शांततेत विजयोत्सव साजरा करण्यात आला . सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापक्षाने प्रतिस्पध्यांना धोबीपछाड देत शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनलने बाजी मारली असल्याची सर्वत्र चर्चा सुरु होती . या निकालावरुन शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . शेतकरी कामगार पक्षाच्या विजयी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जावून आशिर्वाद घेतले . त्याचप्रमाणे शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी उमेदवारांनी दिपकआबा साळुखे पाटील यांचे आशिर्वाद घेतले . निकाल ऐकण्यासाठी होती . यावेळी पो.नि.सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता . ग्रामपंचायत निहाय ध्वनीक्षेपकावरुन निकाल जाहीर करण्यात आला . यावेळी उमेदवार , कार्यकर्त्यासह मतमोजणी केंद्राचा परिसर गर्दीने अगदी फुलुन गेला होता . यावेळी प्रातांधिकारी उदयसिंह भोसले व डी.वाय.एस. पी.दत्तात्रय पाटील यांनी मतमोजणी केंद्रास भेट देवून पाहणी केली .


0 Comments