google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एटीएम कार्डची अदलाबदल करून ७८ हजार परस्पर काढून घेतले

Breaking News

एटीएम कार्डची अदलाबदल करून ७८ हजार परस्पर काढून घेतले

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - वयस्कर व्यक्ती एटीएम मधून पैसे काढत असताना उपस्थित चार जणांनी एटीएम कार्डची आदला बदल करून ७८ हजार रुपयेची रक्कम परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना बुधवार दि . १३ जानेवारी रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास सांगोला शहरात घडली आहे


फसवणूक होऊन आठ दिवस झाले परंतु पोलिसांकडून अद्यापही गुन्हा नोंद केला गेलेला नाही . विठ्ठल राजाराम गुजर रा . अजनाळे ता . सांगोला हे बुधवार दि . १३ जानेवारी रोजी दु.पावणेतीनच्या सुमारास सांगोला शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी गुजर यांच्या पाठीमागे इतर पाच ते सहा जण पैसे काढण्यासाठी आले होते गुजर यांनी पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकले असता पैसे निघाले नाही त्यावेळी पाठीमागील व्यक्तीने तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे पैसे निघत नाहीत असे सांगितले व गुजर पैसे काढत असताना यांचा पासवर्ड पहिला होता दरम्यान उपस्थित तीन ते चार जणांनी काका तुमचे कार्ड खाली पडले आहे असे सांगितले व हातचलाखीने गुजर यांचे एटीएम कार्ड लांबविले पैसे निघत नसल्याने गुजर एटीएम बाहेर आल्यावर त्यांना मोबाईल वर पैसे काढल्याचे मेसेज आले गुजर यांनी आपण पैसे तर काढले नाहीत आणि पैसे काढल्याचा मेसेज आल्याने त्यांनी स्टेट बँकेच्या सांगोला शाखेत धाव घेऊन एटीएम कार्ड ब्लॉक केले तोपर्यंत विठ्ठल गुजर यांचे खात्यातून ७८ हजार रु.काढल्याचे निदर्शनास आले . विठ्ठल गुजर यांनी अज्ञात व्यक्तीने आपले एटीएम कार्ड वापरून पैसे काढून नेल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी गुजर यांना लेखी अर्ज देण्यास सांगितले गुजर यांनी अर्ज देऊन पोहोचही घेतली परंतु पोलिसांकडून अद्यापही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता विठ्ठल गुजर यांनी स्टेट बँक येथून सीसीटीव्ही फुटेजही आणले आहे .

Post a Comment

0 Comments