सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे . या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसला आहे
. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या बदलत्या काळात निवडणुकीचे चिन्हही बदलत गेले . काळानुसार निवडणूक आयोगाने ५० ते ६० च्या आसपास नवीन चिन्ह दिली असली तरी मात्र निवडणूक लढवणान्या उमेदवारांनी पारंपारिक चिन्हांना जास्त पसंती दिल्याचं चित्र आहे . सांगोला तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या| रणधुमाळी सुरू आहे . शेतकरी | कामगार पक्ष , शिवसेना , राष्ट्रवादी | काँग्रेस व भाजप या पक्षाने आपआपले | सर्वाधिक ग्रामपंचायत निवडून येण्याचा दावा केला असला तरी कोणत्याच पक्षाच निवडणूक चिन्ह या निवडणुकीत दिसत नाही आणि | ते येत्या काळात दिसणे शक्य नाही . मात्र कित्येक दशकापासून ओळखीचे असलेले निवडणूक चिन्ह घेतल्याच | चित्र तालुक्यात सगळ्या भागात दिसत आहे .
निवडणूक आयोगाने हेल्मेट | हेलिकॉप्टर , मशीन केक , गालिचा , | ब्रेड , लॅपटॉप , एसी , सीसीटीव्ही , क्रेन , पेनड्राइव्ह , हेडफोन , संगणक ,टोस्टर यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली , तरी चिन्ह वाटपात उमेदवारांनी परंपरागत व जुन्या चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे . अनेक उमेदवारांनी सिलेंडर , कपाट , टी.व्ही . , कपबशी , फॅन , बस , शिलाई मशीन अशा दैनंदिन |वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले . दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी त्या चिन्हांना पसंती दिल्याच चित्र आहे . बदलत्या काळाला अनुसरून यंत्रणा निवडणूक प्रक्रिया जरी हायटेक झाली असली तरी निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा चिन्हांच एक वेगळ आकर्षण सांगोला तालुक्यांमध्ये दिसत आहे . हायटेक प्रचार प्रसाराबरोबर विकास आणि उमेदवार जर हायटेक झाला तर खन्या अर्थाने निवडणूक आयोगाच्याप्रयत्नांना खर यश आलं असे म्हणावे लागेल . दैनंदिन वापरातील विजेरी (ॉर्च ) , कपाट , हेल्मेट , नेलकटर , मिक्सर , माइक , छताचा पंखा , अंगठी , दुर्बीण , कढई , ब्रेड टोस्टर , उशी . फ्रीज , स्टॅपलर , दातांचा ब्रश , जाते , पोळपाट लाटणे , हेड फोन , सेफ्टी पीन अशा घरगुती वस्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे . सोबतच भेंडी , मका , वाटाणे , ढोबळी मिरची , आलं ( अद्रक ) , फुलकोबी ( फ्लॉवर ) , हिरवी मिरची , अननस , कलिंगड , द्राक्षे , पेरू , नारळ , कडई , भुईमूग , पेर , वाटाणे , अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला .



0 Comments