google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अकलूज , माळशिरस दुय्यम निबंधक कार्यालयाला खुलासा देण्याचे आदेश

Breaking News

अकलूज , माळशिरस दुय्यम निबंधक कार्यालयाला खुलासा देण्याचे आदेश

 माळशिरस / तालुका प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील अकलूज व माळशिरस येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी एका निवेदनाद्वारे केली होती . त्याची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी जी.डी. गिते यांनी दुय्यम निबंधक अकलूज व माळशिरस यांना सात दिवसात खुलासा देण्यासाठी आदेश दिले


आहेत . अकलूज व माळशिरस येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी व विक्री करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या स्टॅम्प ड्युटी तसेच कार्यालयामध्ये घेतल्या जाणाऱ्या पावतीची रक्कम देऊन दस्त तयार करून देणाऱ्या संबंधित असलेल्या व्यक्तीची दिल्यानंतर सुद्धा साहेबांचे एक हजार रुपये अधिक घेतले जातात . मात्र , संबंधित दस्त करणाऱ्याला विचारले की हे कशासाठी पैसे द्यायचे तर त्यांची ती फी आहे असे सांगितले जाते . संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी यांना शासनाची पगार असताना त्यांना अधिक फी देणे बंधनकारक आहे का ? याची चौकशी करावी तसेच संबंधित अकलूज व माळशिरस येथे कार्यरत असलेले डफडे व माळशिरस येथील कांबळे यांनी या कार्यालयाचा कार्यभार घेतल्यापासून झालेल्या सर्व खरेदीदार व विक्रीदार यांना बोलावून त्यांनी संबंधित खरेदी विक्री केलेल्या लोकांनी शासनाची तसेच दस्त तयार करणाऱ्यांची फी देऊन अधिक किती पैसे दिले आणि कुणामार्फत दिले याची चौकशी करण्यात यावी , असेही या निवेदनात म्हटले होते .

Post a Comment

0 Comments