सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीपैकी अनेक लहान गावात चुरशीची निवडणूक झाली . शेवटच्या दोन दिवसात अनेकांच्या विजयाचे गणित रात्रीच्या अर्थपूर्ण प्रचाराने कोलमडून जावू शकते . मतपेटीचा कौल कोणत्या पक्षाला अधिक लाभणार या विषयी सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात काल दिवसभर चर्चा ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाच्या घटक असणाऱ्या सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ८२.१७ टक्के मतदान झाल्याने गावपातळीवर नेत्याचे टेन्शन वाढले आहे .
पॅनलप्रमुखाची धाकधूक वाढली आहे . टिकटिक होतय डोक्यात , धडधड होतय हदयात अशी अवस्था निर्माण झाली असून ही धडधड उद्या सोमवारी मतमोजणी झाल्यावरच थांवणार आहे . आपल्या पॅनलच्याविजयाबद्दल पैजा लागत आहेत . या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हांचा व पर नसल्यामुळे स्थानिक राजकीय समिकरणे , गट यानूसार पॅनल झाले . काही अपवाद वगळता प्रत्येक पॅनेलमध्ये सर्वच पक्षाचे स्थानिक नेते एकत्र लढले आहेत . कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञाना सोबत घेत विजय - पराजयाचा अंदाज बांधत असतात . निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते . ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची शक्यता नसली तरी पारावर आणि सोशल मीडियावर निवडणूकीचे वार्तापत्र जोरात सुरु असल्याचे काल दिसून आले . अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहे . ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात ' अंदाज अपना अपना'सुरु झाला आहे . कमी - जास्त मतदानानुसार आकडेमोड करीत कार्यकर्ते एक्झीट पोल व्यक्त करीत आहेत . | अंदाजातून पैजाही लागत प्रभाग आणि मतदान खोलीनुसार मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर आता कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे . गल्ली , रस्ता व वस्तीवरील झालेले मतदान पाहता लगेचच विजयाचे आराखडे सुरू झाले आहे . रोख रक्कमेसह जेवणाच्या पार्टीवर पैजा सुरू झाल्या आहेत . उद्या सोमवारपर्यंत हा अंदाजचे कार्यक्रम करमणुकीचा ठरेल एवढे मात्र खरे .
*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की फॉलो करा*
💜👃🔷🔴🔵🔶👃💜
*सांगोला तालुक्यातील तसेच परिसरातील बातम्यांचा आढावा घेणारे एकमेव न्यूज पोर्टल फेसबूक व्टिटर इंस्टाग्राम गुगल इन आणि युट्युब चॅनेल पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा*
💜💜💜💜💜💜💜💜
✍️✍️✍️🎤🎤🎤✍️✍️✍️
*जाहिरात व बातमी साठी संपर्क*
. ⚕️ साप्ताहिक⚕️ ✍️✍️शब्दरेखा एक्स्प्रेस✍️
✍️मुख्य संपादक. श्री संतोष लक्ष्मण साठे✍️
9️⃣5️⃣0️⃣3️⃣4️⃣8️⃣7️⃣8️⃣1️⃣2️⃣ email.id.shabdhrekhaexpress@gmail.com.⭐RAG.NO.UDYAM-MH-32-0011113⭐



0 Comments