बहुउद्देशीय पत्रकार संघटनेची २०२१-२२ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची रविवार दिनांक ३ जानेवारी रोजी निवड करण्यात आली .
यामध्ये नुतन तालुकाध्यक्ष म्हणून पत्रकार रविप्रकाश साबळे यांची निवड झाली . तर सचिवपदी पत्रकार अॅड.रोहित सोनवणे उपाध्यक्षपदीपत्रकार निसार तांबोळी व खजिनदारपदी पत्रकार सुरज लवटे , सहसचिवपदी महादेव पारसे यांची निवड झाले आहे . सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेची नवीन पदाधिकारी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे दुपारी ४ वाजता संघटनेचे जेष्ठ सल्लागार पत्रकार हमीद इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
सदर बैठकीत मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली . यावेळी गत वर्षाचे अध्यक्ष पत्रकार भारत कदम व सचिव रवींद्र कांबळे यांनी केलेल्या मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा सादर केला . त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड घेण्यासंदर्भात सर्वानुमते ठरले .सदर बैठकीला जेष्ठ पत्रकार हमीद ईनामदार , पत्रकार भारत कदम , पत्रकार गालिबभाई मुजावर , पत्रकार मिनाज खतीब , पत्रकार सचिन भुसे , पत्रकार किशोर म्हमाणे , पत्रकार विकास गंगणे , पत्रकार वैभव काटे , पत्रकार शुभम ऐवळे , पत्रकार दशरथ बाबर , यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते .




0 Comments