google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन हजाराची नोट दिसेना

Breaking News

दोन हजाराची नोट दिसेना

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझव्ह बँकेने सर्व सामान्य नागरिकांच्या हातात थोपविलेली २ हजार रुपयाची नोट आता मात्र दिसेनाशी झाली आहे . त्यामुळे चलनातील सर्वात मोठी २ हजार रुपयांची नोट गेली कुठे , असा प्रश्न सर्वांना पडले असल्याचे बोलले जात आहे . ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती . हा धक्का सामान्य नागरिकांपेक्षा श्रीमंतासाठी मोठा होता . मात्र त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाच अधिक झाला . या


नोटाबंदीत हजार व पाचशे रुपयाची नोट चलनातून बाद केल्यानंतर त्याची उणीव भरून काढण्याकरीता रिझर्व बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून २ हजार व ५०० रुपयाची नोट नविन डिझाईनसह बाजारात आणली . त्यानंतर काही दिवसांनी २०० रुपयांची नोट सुध्दा आली . दरम्यान , नव्याने आलेल्या या तिन्ही नोटा दैनिक व्यवहाराच्या माध्यमातून बँकेत व बाजाराममध्ये वर्ष दोन वर्षे सर्वांच्या दृष्टीस पडल्या . मात्र गत वर्षभरापासून यातील २ हजार रुपयाची नोट सामान्य नागरिकांच्या डोळ्याला दिसणे दुरापास्त झाले आहे . त्यामुळे नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नेमक्या गेल्यात कुठे ? हा प्रश्न सांगोला शहर व परिसरातून उपस्थित

Post a Comment

0 Comments