सांगोला / प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीमाईमुळेच आजच्या महिलांना उच्च शिक्षण घेता येत आहे .
आज मी केवळ महिला शिक्षक म्हणून काम करीत आहे . त्यांचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आहे . आपण आपल्या मुलींना चांगले शिक्षण मिळवून देणे हीच सावित्रीमाईंना आदरांजली असेल असे मत राजश्री कोरे मॅडम यांनी व्यक्त केले . ध्यास जनसेवेचा या ब्रिद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती नेहरू चौक येथे साजरी करण्यात आली . सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन महिला शिक्षिका कळसेबाई , तांबोळी मॅडम , राजश्री कोरे मॅडम , मा.नगरसेविका शोभा फुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाप्रसंगी मा . नगरसेविका शोभा फुले यांच्या शुभहस्ते महिलाशिक्षक दिनानिमित्त वरील शिक्षिकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला . यावेळी कु . सिया सचिन यादव व माऊली चांगदेव राऊत यांचा ही गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला . यावेळी जय ज्योती जय क्रांतीअशा घोषणा देण्यात आले . कार्यक्रमाप्रसंगी अॅड . सचिन पाटकूलकर , दत्तात्रय नवले , रियाजा तांबोळी , पत्रकार रवि साबळे , मा . नगरसेवक विजय राऊत , भोसले सो , इ . मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


0 Comments