google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु

Breaking News

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु

गडचिरोली,(दि. 30 जानेवारी ) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 8 मार्च ,2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन निर्णय क्रमांक स्टॅडई दिनांक 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्र्चित करण्यात आलेले आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी त्यांच्या जिल्हयाच्या संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा.

Post a Comment

0 Comments