सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : जिल्ह्यात आज ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५२ हजार ७३ ९ बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस दिला जाणार आहे . असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली . याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले , जिल्हा प्रशासनाने पोलिओ लसीकरणाची जय्यत तयारी केली असून ७ हजार ५३५ अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ती एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे . शहरी आणि ग्रामीण भागात ३ हजार २२७ पोलिओ लसीकरण केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर लस उपलब्ध असणार आहे . याशिवाय २१२ | टीम आणि १३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत . ३१ जानेवारी रोजी पोलिओपासून | वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी असे तीन दिवस आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ती घरोघरी , वाडीवस्ती , ऊसतोड टोळी , वीट भट्टी याठिकाणी भेटी देऊन लस दिली जाणार आहे
. दरम्यान पोलिओ लसीकरणाचा जिल्हास्तरीय | मोहीमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र , कोंडी ता.उत्तर सोलापूर येथे रविवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० | वा . मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्तेहोणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव | यांनी सांगितले . जिल्ह्यातील | पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे | वयोगटातील बालकांना पोलिओ | केंद्रावर नेऊन लस पाजवून घ्यावी , असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी | केले आहे .
0 Comments