google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एसटी मधील वायफाय गायब ; प्रवाशी वर्गांमधून नाराजी

Breaking News

एसटी मधील वायफाय गायब ; प्रवाशी वर्गांमधून नाराजी

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - दळणवळणाच्या साधनापैकी विमान , रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत.खासगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत . त्यातुलनेत एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशासाठी कुठलीही सुविधा नव्हती . त्यामुळे |


महामंडळाने दोन - तीन वर्षापूर्वी बसमध्ये वायफाय ' सुविधा सुरू केली . त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी वायफायची सोय उपलब्ध झाली होती . परंतू गेल्या अनेक दिवसापासून एसटीमधील वायफाय सुविधा बंद असल्यामुळेकेली जात असून कोट्यावधींचा खर्च वाया गेला आहे . राज्य परिवहन महामंडळाकडून दोन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा करून दिली होती . त्यामुळे स्मार्ट फोनधारकांसाठी बसमध्ये मनोरंजनाची सोय झाली होती . मात्र , प्रवाशांना या बाबीची साथ मर्यादीत ठरली . काही महिन्यातच वायफायचा बोजवारा उडाला . बसमधून वायफाय'चे डब्बेच नाहीसे झालेत . त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू केलेली ही सुविधा बंद पडली आहे . कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवाशासाठी देण्यात आलेल्या सुविधेचा बोजवारा उडाला असून एसटीबसमधील वायफायच्या पेट्याही गायब झाल्या आहेत.लांब पल्ल्याच्या बसमधील स्मार्टफोनधारक स्टोअर केलेले कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेत होते .. यात बातम्या , चित्रपट , ध्वनीफित गाणे , दिसणारे गाणे , कथा , कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचन केले जात होते . त्याचप्रामणे लहान बालकांसाठी कार्टून , व्हिडिओ गेम , कॉमिक्स बुक्सची सुविधा उपलब्ध होती . महिलासाठी | सिरीयलची सुविधा होती . मात्र , काही दिवसात या सुविधेचा बोजवारा उडाला . काही दिवसातच वायफाय नॉट रिचेबल झाले असल्याचे प्रवाशांवर्गामधून बोलले जात आहे .

Post a Comment

0 Comments