google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात CC TV त्वरित बसवावे -मा विजय बनसोडे.

Breaking News

सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात CC TV त्वरित बसवावे -मा विजय बनसोडे.

सांगोला-(साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस) येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्वरित सीसीटीव्ही बसवण्याची मागणी भिम शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय बनसोडे यांनी केलेली आहे .सांगोला तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तालुक्यातील व शहरातील अनेक नागरिक शेतकरी मालमत्ताधारक यासह सर्वसामान्य नागरिक खरेदी विक्री तसेच अनेक कागदपत्रे काढण्यासाठी या कार्यालयामध्ये येत असतात, तसेच सांगोला येथील कार्यालय हे नेहमीच वादग्रस्त कार्यालय म्हणून ओळखले जात आहे.  या कार्यालया संबंधित अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे या कार्यालयातील सर्व कर्मचारी व या कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिका वरती लक्ष ठेवण्यासाठी इतर कार्यालया प्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे त्यामुळे या कार्यालयातील होणाऱ्या गैरप्रकारावर ती देखील आळा बसू शकतो तसेच जर एखांदा दस्त बनावट करण्याचा प्रयत्न केल्यास सीसीटीव्ही असल्यामुळे या गोष्टीला आळा बसणार आहे तसेच जर एखाद्या व्यक्तीने वरिष्ठ कार्यालयास तक्रार केल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्याला तपास करण्यास सोपे जाईल व होणारा गैरप्रकार थांबल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे .

यापूर्वी या कार्यालयामध्ये बनावट व्यक्ती उभे करून दस्त केलेल्या चे प्रकार आढळून आलेले आहेत त्यामध्ये कारवाईदेखील झालेली आहे परंतु असेच प्रकार जर पुन्हा होण्याची शक्यता लक्षात घेता या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसल्यास होणाऱ्या बेकायदेशीर दस्त नोंदणीला आळा बसेल व त्या व्यक्तीचे किंवा सामान्य नागरिकाचे नुकसान होणार नाही तसेच या कार्यालयातील होणारे गैरप्रकार रोखण्याचे काम हे सीसीटीव्ही कॅमेरे करणार आहेत तसेच या कार्यालय मध्ये दिवसभर हेलपाटे मारणारे एजंट तसेच तोतया व्यक्ती वारंवार या कार्यालयामध्ये का येतात याचादेखील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासल्यास कारवाई करण्यासाठी या सीसीटीव्ही चा मोठा फायदा सरकारी अधिकाऱ्यांना होणार आहे. तर सीसीटीव्ही कार्यालयात असल्यामुळे एजंट चे प्रमाण पूर्णपणे कमी होऊन शेतकऱ्यांची व नागरिकांची होणारी  आर्थिक पिळवणूक  थांबणार आहे 

त्याच बरोबर  सांगोला येथे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नव्यानेच सुरु होणारे कार्यालयांमध्ये सुद्धा सुरुवातीपासूनच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे तसेच जुन्या कार्यालयांमध्ये ताबडतोब कॅमेरे बसवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय बनसोडे यांनी केलेले आहे तरी या मागणीची दखल घेऊन या कार्यालयातील होणारे गैरप्रकार व लुबाडणूक थांबण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments