सागाला ( प्रतिनिधी ) : सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी शेकापक्ष , भाजप व आनंदा माने गटाचे प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर यांची निवड झाली . प्रशांत धनवजीर यांना १२ तर विरोधी राष्ट्रवादी , शिवसेनेचे उमेदवार जुबेर मुजावर याना ८ मते मिळाली
. प्रशांत धनवजीर यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करीत फटाक्याची आतषबाजी केली . सांगोला नगरपरिषदेत एकूण २० सदस्य आहेत शेकापक्ष , राष्ट्रवादीव अपक्ष यांच्या सांगोला शहरविकास आघाडीचे १२ तर सर्वपक्षीय महायुतीचे ८ नगरसेवक निवडून आले होते तर महायुतीच्या राणीताई माने या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या . विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही आघाड्यांत बिघाडी झाल्याने शेकापचे ४ व आनंद माने गटाचे ७ नगरसेवक व नगराध्यक्षा राणीताई माने यांची ऐनवेळी आघाडी झाली . शेकापचा एक गट सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याच्या विरोधात होता .आघाडीचा धर्म फक्त शेकाप कडून पाळला जातो . प्रत्येक निवडणुकीत मित्रपक्ष जास्त जागा पदरात पाडून घेतात व कार्यकर्त्यांना गाफील ठेवून शेकापचे उमेदवार पाडले जात होते या आघाडीने तालुक्यात शेकापचे खूप नुकसान झाले तरीही माजी आ . गणपतराव देशमुख यांच्यामुळे शेकापचे कार्यकर्ते गप्प होते विधानसभा निवडणुकीतहीआघाडीचा धर्म फक्त शेकाप कडून पाळला जातो . प्रत्येक निवडणुकीत मित्रपक्ष जास्त जागा पदरात पाडून घेतात व कार्यकर्त्यांना गाफील ठेवून शेकापचे उमेदवार पाडले जात होते या आघाडीने तालुक्यात शेकापचे खूप नुकसान झाले तरीही माजी आ . गणपतराव देशमुख यांच्यामुळे शेकापचे कार्यकर्ते गप्प होते विधानसभा निवडणुकीतहीराष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी करीत आघाडीचा धर्म न पाळल्याने शेकापच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला तेंव्हापासून शेकापचे कार्यकर्ते नाराज होते . बुधवार दि . २० जानेवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रशांत धनवजीर यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर थोड्यावेळाने जुबेर मुजावर यांनी अर्ज दाखल केला . दुपारी एक वाजता नगर परिषद सभागृहात प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली . यावेळी हात वर करून मतदान घेण्यात आले
. रफिक तांबोळी , सुरेश माळी , गजानन बनकर , स्वाती मगर , भाजपचे चेतनसिह केदार , आनंदा माने , अस्मिर तांबोळी , प्रशांत धनवजीर , छाया मेटकरी , रंजना बनसोडे , अप्सरा ठोकळे व राणीताई माने आदी १२ जणांनी प्रशांत धनवजीर यांना मतदान केले तर विरोधी जुबेर मुजावर यांना सोमनाथ लोखंडे , सतीश सावंत , पूजा पाटील , अनुराधा खडतरे , सुनीता खडतरे , जुबेर मुजावर , स्वाती मस्के , शोभा घोंगडे आदी ८ मते मिळाली . पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी प्रशांत धनवजीर यांना प्रतिस्पर्धी उमेदवार जुबेर मुजावर यांच्यापेक्षा जास्त मते पडल्याने प्रशांत धनवजीर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले .



0 Comments