google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील ४८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील ४८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून सांगोला तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने ४८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे .


त्यातील २० जणांना हद्दपार , तर ४६४ जणांना अटी - शर्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली . ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून सांगोला पोलिसांनी खबरदारी घेतली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहर व तालुक्यात कोणताही प्रकार घडू नये , तालुक्यात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी , शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी सांगोला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे . सीआरपीसी १०७ प्रमाणे २८५ जणांवर कारवाई , सीआरपीसी ११० प्रमाणे ३२ जणांवर , सीआरपीसी १४४ ( २ ) प्रमाणे २० जणांना हद्दपार , सीआरपीसी १४ ९ प्रमाणे १४७ जणांना नोटीस बजावली आहे .मुंबई पोलीस कायदा कलम ९ ३ प्रमाणे ३२ कारवाया , ग्रामपंचायत निवडणूक काळात २५ दारूच्या केसेस , ५ जुगार , अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई केली आहे . ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सांगोला पोलिसांनी कडक पावले उचलली असून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे .

Post a Comment

0 Comments