google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान ; प्रशासन सज्ज ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर होणार

Breaking News

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान ; प्रशासन सज्ज ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर होणार

 सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवारी दि . १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे . या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून २६५ मतदान केंद्रांवर तयारी सुरु करण्यात आली आहे


. १ हजार ४५० कर्मचारी मतदान केंद्रांवर काल रवाना झाले . ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या १२७ ९ जागासाठी उभा असणाऱ्या उमेदवारांचे भविष्य मशिनबंद होणार आहे . दक्षता म्हणून प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणुक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपात सॅनिटायझर , मास्क देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुक निर्भयपणे व शांततेत होण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे . सांगोला तालुक्यातील वाटंबरे , मेथवडे , चोपडी , गायगव्हाण , तिप्पेहळ्ळी या ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत . उर्वरित ५६ ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवार दि .१५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . मतदान मतदान अधिकारी , कर्मचारी , कंट्रोल युनिट , बॅलेट मशिन पोहोच करण्यासाठी १८ एसटी बसेस , १८ बस , २ जीपची व्यवस्था करण्यात आली होती . मतदानासाठी ३२५ पोलीस नेमण्यात आले आहेत . महसूल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकेही तयार करण्यात आली आहेत . निवडणुकीसाठी नेमणूक केलेले १ हजार ४५० कर्मचारी साहित्य घेऊन काल गुरुवारी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींकडे रवाना झाले आहेत . मतदान केंद्रावर गेलेले कर्मचारी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवतील . त्यानंतर निवडणूक मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मॉकपोल घेतला जाईल . त्यानंतरच निवडणूक मतदान सुरु होईल . निवडणूक मतमोजणी निकाल सोमवार दि .१८ जानेवारी २०२१ रोजी सांगोला येथे होणार आहे .

Post a Comment

0 Comments